निवडणूक समितीत मातंग समाजाचा समावेश करा. 

0
IMG-20240124-WA0098

मुंबई, दि, १२ फेब्रुवारी:

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची निवडणूक समिती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ५२ सदस्यांच्या या निवडणूक समितीत मातंग समाजाचा एकही सदस्य नाही. या निवडणुक समितीत मातंग समाजाच्या सदस्यांचा समावेश करण्यात यावी अशी मागणी मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया यांच्याकडे केली आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसाठी रमेश चेन्नीथला तर अनुसुचित जाती विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी राजेश लिलोठीया मुंबईत आले असताना सुरेशचंद्र राजहंस यांनी ही बाब वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली व एक निवेदनही त्यांना सादर केले, रमेश चेन्नीथला, नाना पटोले व लिलोठीया या तिघाही वरिष्ठ नेत्यांनी राजहंस सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. अनुसुचित जातींमध्ये लोकसंख्येनुसार हा समाज दोन नंबरचा आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात असलेला हा समाज सातत्याने काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. मातंग समाजाला योग्य प्रतिनिधीत्व मिळावे असे सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *