कॉंग्रेसचे बाबा सिद्दीकी NCP मध्ये.
मुंबई दि. ११ फेब्रुवारी –
काँग्रेचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी अजित पवार म्हणाले की, बाबा सिद्दीकी यांनी आयुष्यात एका जातीचे कधी काम केले नाही तर सर्व धर्माचे ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या कामाच्या बळावर ते जनतेतून निवडून आले आहेत. सुनिल दत्त यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ दिला नाही. राजकारणात सातत्याने निवडून येणारा माणूस जनतेची कामं करत असतो. लोकांमध्ये समरस व्हावे लागते त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात त्याचपध्दतीने बाबा सिद्दीकी काम करत आहेत.
आज अनेक तरुणांनी पक्षात प्रवेश केला. या तरुणांचा जोश राष्ट्रवादी काँग्रेस वाढीसाठी होणार आहे. बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या सर्व समर्थकांची भविष्यात चांगली मदत झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अंतर देण्याचे काम होणार नाही. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आजपासून नवा प्रवास सुरू केला आहे. आमच्या परिवाराचे सदस्य झाला आहात. पक्षात तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही तुमचा मान – सन्मान राखला जाईल. जुन्या नव्याचा समन्वय साधून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण केले तेच बेरजेचे राजकारण करण्याचे काम करुन दाखवू. त्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला, त्यांनीच महाराष्ट्राला दिशा दिली आहे ती दिशा कधी चुकू देणार नाही अशी ग्वाहीही अजित पवार यांनी दिली.
