धारावीकरांचे पुनर्वसन धारावीत झाले पाहिजे..

0
20240107_180810

धारावीकरांचे पुनर्वसन धारावीत झाले पाहिजे..

मुंबई, दि. ६ फेब्रुवारी :

मुंबईचे महत्व करण्यासाठी दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारने मुंबई बरबाद करण्याचा विडाच उचलेला आहे. मुंबई विमानतळानंतर धारावी अदानीच्या घशात घालून मुंबईचे लचके तोडले जात आहेत. धारावी मुंबईची ओळख आहे, मुंबईची संस्कृती आहे व मुंबईचा आत्मा आहे. धारावी प्रकल्पाच्या आडून धारावीकरांना विस्थापित करण्याचे षडयंत्र आहे परंतु हे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीत झाले पाहिजे इतर कोणत्याही जागी नाही म्हणजे नाही, असा खणखणीत इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

 

दिनांक ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, धारावी पुनर्वसनासाठी केंद्राकडून मिठागराची जागा हमी पत्रासह राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मालकीची सुमारे २८३ एकर मिठागराची जमीन धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी ९९ वर्षाच्या भाडेतत्वावर राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्याबाबत केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. सरकार धारावीतील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी असा प्रकारे इतर जागा देत आहे. याआधी मुलुंड येथील ६३ एकर भूखंड धारावी पुनर्विकासासाठी मुंबई महानगरपालिकेकडे मागितल्याच्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. राज्य सरकारच्या अशा कुठल्याही प्रयत्नांना धारावीकरांचा तीव्र विरोध राहिल, धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे.

 

मुंबई काँग्रेस धारावीकरांच्या न्याय हक्कांसाठी भक्कमपणे धारावीकरांच्या बरोबर आहे. धारावीकरांच्या मुळावर येणाऱ्या कोणत्याही निर्णयाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला केला जाईल. सरकारच्या कोणत्याही आमिषाला धारावीकर बळी पडणार नाहीत. मुंबईचे लचके तोडणाऱ्यांना, मुंबईकरांशी गद्दारी करणाऱ्यांना, धारावीकरांना विस्थापित करु पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *