NCP पक्ष व ‘घड्याळ’ चिन्ह अजित पवारांचे..

0
IMG-20240118-WA0103

मुंबई दि. ६ फेब्रुवारी –

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जसा निकाल निवडणूक आयोगाने दिला तसाच निकाल देत निवडणूक आयोगाने शरद पवार यांनाही मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे घड्याळ चिन्ह दोन्हीही अजित पवार यांना देण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबध्द होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू असा विश्वास अजित पवार यांनी आज जनतेला दिला.

निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्विकारत आहोत. या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखीन वाढली आहे अशी प्रतिक्रिया देतानाच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत अजित पवार यांनी आभारही मानले.

तर, सत्याचा विजय! लोकशाहीचा विजय! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ नाव व ‘घड्याळ’ चिन्ह हे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राखून ठेवल्याबद्दल निवडणूक आयोगाचे सुनिल तटकरे यांनी आभार मानतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांचे ट्वीट करत मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *