‘महालक्ष्मी’ प्रकल्प बिल्डरांच्या मोफत FSI साठी.
मुंबई, दि. ४ फेब्रुवारी;
महालक्ष्मी रेसकोर्स प्रकरणी शिवसेना आक्रमक झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बिल्डर सोबत साटेलोट सुरू होते असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मुंबईकरांच्या पैशातून बिल्डरला मोफत FSI देणार आहात म्हणूनच मोठ्या प्रमाणात या पार्कला विरोध होत आहे, असे माजी मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निक्षून सांगितलं.
पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, रेसकोर्सवर तबेले बांधले जाणार आहेत पण घोडे हे सुटाबुटतील लोकांचे आहेत. ज्यांना तबेले बांधून दिले जाणार आहेत.पण जनतेचा पैसा त्यासाठी का वापरला जातोय ? लाच देणं सुरू होतं, आत्ता सेंट्रल पार्क चा घाट घातला जातोय ! कोणत्या बिल्डरसाठी हे सुरू आहे ? सेलिब्रिटींना ट्विट करायला लावलं पण प्रकल्प उभारताना बाजूच्या कोणत्या SRA मध्ये अजूबाजूच्या लोकांना सामावून घेणार ?
‘आम्ही प्रश्न घेतल्यानंतर क्लब हाऊस कॅन्सल झाले पण आम्ही तिथे कार पार्क प्रकल्प करू देणार नाही. मुंबईकरांचा पैसा वाया जाऊ देणार नाही. कारण रेस कोर्सचा वापर हा सामान्य मुंबईकरांना योगा, मॉर्निंगवॉक साठी होतो. इथे 100 कोटी रुपये खर्च करून तबेले बांधून दिले जाणार आहेत पण IRWTC हे स्वतः देखील ते करू शकत होते. सेंट्रल पार्क होणार त्याबद्दल मुख्यमंत्री आणि प्रशासक खोटे बोलत आहेत. IRWITC ला मुलुंड येथील जागा घ्यायला लावणार होते. वेलिंग्टन क्लब आणि इतरही क्लबची लिझ संपलेली आहे..आम्ही तिथे लॅण्डस्केप मैदान करायला सांगणार होतो पण प्रशासक सतत त्यांची भूमिका बदलत आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
