IMG-20240119-WA0085

जनता अदालत नंतर खोके सरकार क्रूर!

मुंबई, दि. २२ जानेवारी;

जनता अदालत घेतल्यानंतर खोके सरकार क्रूरपणे वागत आहे. जनता दरबारनंतर लगेच सूरज चव्हाण यांना अटक झाली,राजन साळवींना त्रास दिला जात आहे. राजन साळवींनी लढण्याची भूमिका घेतली आहे, त्यांनी काही चूक केली नाही आणि केली असती तर तुमच्या सोबत ते आले असते’असे म्हणत सरकारच्या क्रूर वागण्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रहार केला.

रेस कोर्स संदर्भात आदित्य ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे . पत्रकार परिषदेत बोलताना ‘रेस कोर्स मध्ये मध्ये ओपन हाऊस घेतलं. पण त्यात प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही . थीम पार्क आमचा देखील मुद्दा होता पण कोणतही कन्स्ट्रक्शन न करता पण आता हा प्रकल्प राबवून मुंबईकरांचे पैसे तबेल्यांवर वापरणार आहात का ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी सरकारला केला. एफएसआय बाजूच्या गृहनिर्माण प्रकल्पाला देण्याची गरज काय आहे ? वर बांधकाम न करण्याची मागणी मान्य झाली होती पण अंडरग्राउंड पार्कींग देखील आम्ही होऊ देणार नाही असा इशारा देतानाच RWRTC ने त्यांचा दंड भरावा आणि पुन्हा मैदान लिज वर घ्यावं असे आवाहन आदित्य यांनी केले आहे.

 

राज्य सरकारचे शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर गेलं आहे. या दौऱ्यासंदर्भात बोलताना ‘परदेश दौर्यावर खूप खर्च झाला आहे. गेल्या वर्षी ४० खोक्यांचा खर्च झाला होता मात्र गेल्यावर्षीच्या अनेक प्रकल्पांचं पुशे अद्याप काही झाल नाही अशी माझी माहिती आहे. काही झालचं असेल तर उद्योग मंत्र्यांनी पुढे येऊन पुरावे द्यावे, तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्री दिड दिवस डावोस ला गेले होते . ४० लोक घेऊन गेले होते पण तेव्हा एमआयडीसी ला २० कोटी खर्च दाखवण्याच बंधन होत पण तिथे काय केल ? तर ज्या उद्योग पतींना ईथे भेटणे अपेक्षित होते ते त्याना तिथे भेटले ,, त्यामुळे काम शुन्य झाल. वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम मध्ये मला तीन वेळा बोलायला मिळाले होते. तिथे या मुख्यमंत्र्यांचा एक फोटो नाही. कदाचीत ते भाजपच्या परवानगीच्या प्रतिक्षेत होते आणि आता ते MOU झाले आहेत त्यांच्या सोबत आमची पण चर्चा झाली होती पण यांनी हे MoU थांबवून ठेवले होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या मागील दौऱ्यावर आदित्य ठरे यांनी सवाल उपस्थित केले.

 

मुख्यमंत्री बर्फात जाऊन खेळायचं होतं. सुट्टी घालवायची होती पण वायब्रंट गुजरात मध्ये २६ लाख कोटींची गुंतवणूक झाली. तामिळनाडूत देखील ६.५ लाख कोटींचे एमओयू झाले पण या शिष्टमंडळलाला एमईएस ची परवानगी होती का, हे देखील स्पष्ट नाहीये तर जे कोणी स्वखर्चाने गेल्याचा दावा करतायत त्यांनी नावे सादर करावी. एमएमआर मधील अधीकारी आणि एका खासदाराने दावोस येथे संबोधन केले , हे कोण नातेवाईक आहेत का मुख्यमंत्र्यांचे ? आणि महत्वाचं म्हणजे खासदाराला राज्याच्या वतीने जाण्याची परवानगी आहे का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *