आपले हिंदुत्व आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक..
मुंबई, दि. २२ जानेवारी:
आपले हिंदुत्व आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे.जेव्हा राम मंदिराबाबत कोणी बोलत नव्हते तेव्हा उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. ‘पहिले मंदिर फिर सरकार’ असे सांगितले होते आणि सुप्रीम कोर्टामुळे राम मंदिर उभे राहत आहे असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले.
देशात एकमेव हिंदुहृदय सम्राट आहेत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे.बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नावावर कधी पक्ष फोडले नाहीत. रामराज्य हेच बाळासाहेबांचे हिंदुत्व होतं’ तसेच प्राण जाय पर वचन न जाये हे आपलं हिंदुत्व आहे. असं म्हणत शिवसैनिकांना चेतना दिली.
अच्छे दिन आने वाले है सांगून अनेकांनी खोट्या थापा मारल्या. पंधरा लाख खात्यामध्ये येणार होते ते आले का ? असा सवाल उपस्थितांना केला तसंच आपण जी वचनं देतो ती पूर्ण करून दाखवतो.
२०२४ ला आमचे सरकार येणार म्हणजे येणार आणि त्यावेळी घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार’ असा इशारा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती अत्यंत धाईट आहे. पुढील काही वर्षात पगारही देता येणार नाही अशी स्थिती निर्माण होईल.
उद्धव ठाकरेंनी एवढं सगळं दिलं तरीही ४० लोकांची टोळी त्यांची होऊ शकली नाही, ती तुमची काय होणार ? असा सवाल उपस्थित निष्ठावान शिवसैनिकांना आदित्य ठाकरे यांनी केला आणि राहुल नार्वेकर यांनी भाजपच्या संविधानाप्रमाणे निकाल दिला आहे तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे दिलेला नाही.
राज्याच्या औद्योगिक परिस्थितीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले ‘खोके सरकार आल्यानंतर या राज्यात एकही नवीन उद्योग आला नाही. सगळे उद्योग, फिल्मफेअर अवार्ड गुजरातला गेले. आपल्या राज्यात हमखास येणार होते ते प्रकल्प खेचून गुजरातला घेऊन गेले.. वर्ल्ड कप फायनल मुंबईत वानखडे ला झाली असती, तर आपण जिंकलो असतो. पण अन्याय करण्यासाठी यांच्याकडे देशातल एकमेव राज्य महाराष्ट्र आहे. पण महाराष्ट्र म्हणून आपल्याला विचार करावा लागेल, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केलं.
महिला खासदाराला शिवीगाळ करणारे आता गद्दार गँगचे मंत्री आहेत..उद्धव ठाकरेंनी अशा लोकांना गेट आउट केलं असतं.. गणपती मिरवणुकीत गोळीबार करणारे इथले चींधीचोर घेतले आहेत. गणपती मिरवणूकीत गोळीबार करणाऱ्याला सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष केले आहे.. उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही..पण आपलं सरकार आल्यावर अतिरेक्यांसाठी जो कायदा आहे, तो या टपोऱ्यांसाठी वापरणार.. असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
