प्राणप्रतिष्ठेनिमित्त भाजपाची मंदिर स्वच्छता
मुंबई, दि २० जानेवारी:
प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरांच्या स्वच्छतेचे आवाहन केले असून त्या अंतर्गत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईतील मंदिरामध्ये स्वच्छता करण्यात आली.
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दादर येथील श्री दत्त मंदिरात स्वच्छतेचे काम केले. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वाळकेश्वर येथील मंदिरात स्वच्छता केली. खा. मनोज कोटक यांनी भांडुप पश्चिम मधील हनुमान मंदिराची साफसफाई करून श्रमदान केले. खा. पूनम महाजन यांनी वांद्रे पूर्व येथील मंदिरात स्वच्छता केली. खा. गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. आ. अमित साटम यांनी अंधेरी येथील हनुमान मंदिरात साफसफाई केली. आ. भारतीताई लवेकर यांनी वर्सोवा येथील साई मंदिरात दर्शन घेऊन श्रमदान केले. आ. विद्या ठाकूर यांनी गोरेगाव येथील संकल्प सिद्धी गणेश मंदिरातील स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. कुलाबा येथे माजी नगरसेविका रिटा मकवाना यांनी काळाराम मंदिर ठाकूरद्वार येथे स्वच्छता अभियान राबवले.माटुंगा येथे
शंकर मठ मंदिरात माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांच्या नेतृत्वात स्वच्छता करण्यात आली. मुंबई भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
