खिचडी घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करा.
खिचडी घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करा.
मुंबई, दि. २० जानेवारी:
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पक्ष सचिव संजय माशिलकर यांच्या भोवतीच्या वादावर आम आदमी पार्टीने तीव्र चिंता व्यक्त केली असून संजय माशिलकर आणि त्यांची दोन मुले भागीदार असलेले फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस ह्या कंपनीला एप्रिल-जुलै 2020 मध्ये कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित कामगारांना खिचडी वाटपासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ८.६४ कोटी रुपयांचे कंत्राट दिले. मुंबई पोलिसांनी एफ.आय.आर. मध्ये फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसने आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आवश्यक परवान्याशिवाय खिचडी वितरणाचे कंत्राट मिळवले होते असा गंभीर आरोप आम आदमी पार्टीच्या प्रती मेनन यांनी केला आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक एफ.आय.आर. मध्ये फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या फर्मच्या भागीदारांची ओळख पटली नाही परंतु या फर्मचे मालक संजय माशिलकर आणि त्यांची २ मुले प्रीतम आणि प्रांजल आहेत. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याने BMC ने दिलेले संपूर्ण खिचडी कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर, पोलिस तसेच अंमलबजावणी संचालनालय द्वारे केल्या गेलेल्या तपासावरसुद्धा शंका निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सचिव असलेले संजय माशिलकर व मुख्यमंत्री यांच्यातील घनिष्ठ मैत्रीमुळे कायदेशीर कार्यवाहीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांच्या हस्तक्षेप होत आहे का? असा थेट प्रश्न प्रीती मेनन यांनी उपस्थित केला आहे.
संजय माशिलकर आणि त्यांच्या दोन मुलांच्या नावांचा एफ. आय. आर. मध्ये उल्लेख केला नाही आणि अशा प्रकारे कथित खिचडी वितरण घोटाळ्याच्या संदर्भात त्यांची अटक टाळला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या त्यांच्या ओळखीच्या उद्योजकांना आणि मित्रांना संरक्षण देत असून विरोधी पक्षाच्या पदाधिका-यांना मात्र अटक करत आहे.
पारदर्शकता, उत्तरदायित्व, नागरिकांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची वसुली आणि कायद्याचे राज्य राखण्यासाठी खिचडी घोटाळ्याची सखोल आणि निःपक्षपाती चौकशी सुरू करावी अशी मागणी प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.
