लोकसंगीत देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा ठेवा.
लोकसंगीत देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा ठेवा..
मुंबई दि. १७ जानेवारी : –
लोक संगीताचे सूर मनात ऊर्जा व चैतन्य निर्माण करतात. लोकसंगीत हे देशाचे सांस्कृतिक वैभवाचा ठेवा आहे. आईच्या आवाजानंतर मनाला ऊर्जा देणारा आवाज म्हणजे लोकसंगीताचा आवाज आहे, अशा भावना वन, मत्स्यव्यवसाय, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
गोरेगाव येथील स्टुडिओमध्ये सुरू असलेल्या प्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या भारत का अमृत कलश कार्यक्रमास वन, मत्स्यव्यवसाय आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यावेळी कार्यक्रमात सहभागी कलाकारांशी संवाद साधताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी गायक कैलास खेर यांनी त्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले.
मनाला ऊर्जा देणाऱ्या लोकसंगीताच्या स्वरांनी आपण आज मंत्रमुग्ध झालो आहोत, अशी भावना व्यक्त करून श्री. मुनगंटीवार म्हणाले, गायक हे कोहिनूर पेक्षाही श्रेष्ठ असतात,असे गौरवउद्गारही काढून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व गायक व कलाकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।। या कवितेचे वाचन केले.
