आठवले

The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

मुंबई दि. ११ जानेवारी –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल नियमानुसार आणि कायदेशीर आहे. बहुमताच्या बळावर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपदाचे सिंहासन अबाधित राहिले आहे. या निर्णयाने उध्दव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे  अशी प्रतिक्रीया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील आमदारांवर  पात्रतेबाबत निकाल देतांना त्या सर्वांचे सदस्यत्व अधिकृत ठरविले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही अधिकृत शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे. शिवसेनेने 1999 मध्ये शिवसेनेचे संविधान बनविले त्यानंतर आता पुन्हा नविन संविधान बनविले. हा निकाल देतांना स्पिकर राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे जुने 1999 चे संविधान आहे. तेच संविधान स्विकारले जाणार असल्याचे सांगितले आहे. सुनिल प्रभु यांची 16 आमदारांना निलंबीत करण्याची फेटाळून लावली आहे. शिवसेनेच्या जुन्या घटनेनुसार उध्दव ठाकरे यांना एकटयाला कोणत्याही आमदाराला पक्षातुन काढुन टाकण्याचा, निलंबीत करण्याचा पक्ष प्रमुख म्हणून  अधिकार नाही असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे शिवसेनेचे उध्दव ठाकरेंनी नियुक्त केलेले व्हीप सुनिल प्रभु हे अनधिकृत व्हीप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेले व्हीप भरत गोगवले हेच खरे शिवसेनेचे व्हीप असल्याचा निकाल स्पिकर राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

या निर्णयामुळे उध्दव ठाकरे यांच्या गटाला फार मोठा झटका बसला आहे. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला हा फार मोठा झटका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना अधिकृत ठरणारा आजचा निकाल स्वागतार्ह निकाल आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या निर्णयाचा महायुतीला प्रचंड फायदा होणार आहे. लोकसभेमध्ये 45 पेक्षा जास्त खासदार निवडुन आणण्याचा निर्धार आहे. तो निर्धार या निकालाने नक्कीच पूर्ण होईल. यापूर्वी निवडणुक आयोगाने सुध्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला होता. त्यानुसार त्यांना शिवसेनेच निवडणुक चिन्ह धनुष्यबाण   ही देण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 आमदार असल्यामुळे बहुमताच्या बळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणुक आयोगाने दिला होता. त्यानुसार महाराष्ट्राचे स्पीकर राहुल नार्वेकर यांनी सुध्दा बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. लोकशाही मजबुत करणारा निकाल आहे. घराणेशाही ऐवजी लोकशाहीला बळ देणारा हा ऐतिहासीक निकाल आहे असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. या निकालाबद्दल रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *