प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’ आघाडीत घ्या !

0
20221226_201729

प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’ आघाडीत घ्या !

पुणे, दि. २५ डिसेंबर ;

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतले पाहिजे असे इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सांगितले, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले की, सर्व्हे नेहमी येत असतात त्यात ते अनेकवेळा खरे खोटे असतात. आताच पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याचे सर्व्हे वेगळे आकडे सांगत होते पण प्रत्यक्षात लोकांनी अंतिम निकाल वेगळा दिला त्यामुळे सर्व्हेवर अवलंबून राहून कुणी निष्कर्ष काढू नये.

क्रीडा मंत्रालायने भारतीय कुस्ती परिषदेची नवी बॉडी निलंबित करण्यास उशीर केला. त्यांनी यापूर्वीच हे करायला हवे होते. ज्या महिला खेळाडूंनी भारताचा सन्मान वाढवला. त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. देशाकडून खेळताना कर्तृत्व गाजवणाऱ्या महिला खेळाडूंसोबतची वागणूक योग्य नव्हती. यापूर्वीच भारतीय कुस्ती परिषदेच्या सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार म्हणाले की, इथेनॉलचं उत्पादन वाढवावं अशी मागणी सर्वांची आहे. देशात वाहने वाढत आहेत. त्यामुळे त्याचे उत्पादन वाढवणं गरजेचे आहे. इथेनॉलला आम्हीदेखील प्रोत्साहन दिलं. पण आत्ताच्या केंद्र सरकारच्या नितीमध्ये कमतरता असल्याचे शरद पवार साहेब म्हणाले. याबाबात काही गोष्टी शिल्लक असून, आपण स्वतः मोदी आणि शहा यांना लोकांचं म्हणणं पाठवलं असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *