आमचे बंड नव्हते, बसून निर्णय घेतलेला.
आमचे बंड नव्हते, बसून निर्णय घेतलेला.
पुणे, दि.२५ डिसेंबर :
नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी काळजी घेतली मात्र गेल्या १०-१५ वर्षात बारामतीत लक्ष घातले नाही. मी कधीच कुठला निर्णय घेतला नाही, निर्णय घेतल्यानंतर त्याची कुठलीच तक्रार नसायची, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यातील भीमथडीचे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले की, आमचे बंड नव्हते, आम्ही बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन सर्वांनी बसून निर्णय घेतला होता त्याबद्दल कुणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केलं असेल तर त्याबद्दलही तक्रार करण्याची गरज नाही. फक्त पक्षाची निर्मिती कशी झाली? पक्षाचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही.
गेली १० ते १५ वर्ष बारामती आणि त्या भागात माझं लक्ष नाही. साखर कारखाना आणि अन्य संस्थांच्या पदावर कुणी जावं आणि कुणी जबाबदारी घ्यावी यात मी लक्ष घातलं नाही. गेल्या दहा वर्षात एकाही गोष्टीत मी लक्ष दिलं नाही. त्यामुळे कुणालाही काम करण्यात अडचण आणण्याची भूमिका घेतली नाही. परिसराचा नावलौकिक वाढेल याची काळजी घ्यावी.कुणी कुणाचं ऐकावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पक्ष म्हणून मी नेहमी नव्या लोकांना संधी देण्याची काळजी घेतली यात मला आनंद आहे असे शरद पवार म्हणाले.
