महाराष्ट्र:कोरोनाचे आकडे चिंता वाढवणारे!
मुंबई, दि. 6 सप्टेंबर :
कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. मागील काही दिवसात महाराष्ट्रात कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई, ठाणे सारख्या शहरात ब-याच प्रमाणात नियंत्रण मिळवत रुग्ण संख्या कमी झाली होती. पण सहा सात दिवसांपासून रुग्ण संख्या वाढू लागली आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे तब्बल २३ हजार ३५० नवे रुग्ण आढळले आले आहेत. तर दिवसभरात आणखी ३२८ जणांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. एकीकडे करोना नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केेेले जात असतानाच अनेक निर्बंध शिथील केेेले जात आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे.
शनिवारी महाराष्ट्रात २० हजारांपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती, रविवारी तो आकडाही मागे पडला आहे. राज्यात प्रत्यक्ष २ लाख ३५ हजार ८५७ इतके एक्टिव्ह रुग्ण असून त्यात सर्वाधिक ६२ हजार ३८३ रुग्ण एकट्या पुुणे जिल्ह्यातील आहेत. राज्यात पुणे जिल्ह्यातील स्थिती अधिकच नाजूक बनली आहे. पुण्यातील आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्याही २ लाखांच्या जवळ पोहचली आहे. पुण्यानंतर ठाणे जिल्ह्याचा नंबर लागतो. ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २४ हजार ९४१ रुग्ण आहेत तर मुंबई महापालिका हद्दीत २३ हजार ९३९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. मुंबईत गणेशोत्सवानंतर रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची संख्या ५०० पर्यंत खाली आली असताना गेल्या काही दिवसांपासून हा आकडा दोन हजारच्या जवळ जाऊन पोहचला आहे.
राज्यात कोरोना मृत्यूदर २.९३ टक्के इतका आहे. अनेक प्रयत्न करूनही मृत्यूदर कमी होऊ शकलेला नाही. राज्यात आणखी ३२८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला कोरोना बळींचा एकूण आकडा २६ हजार ६०४ इतका झाला आहे. ३२८ मृतांपैकी २४३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर ४३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
कोरोना रुग्णांचे हे वाढते आकडे चिंता वाढवणारे आहेत. आरोग्य विभाग शर्थिचे प्रयत्न करत आहे. जनतेनेही मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छतेचे नियम यांचे पालन केले पाहिजे….
