जातीनिहाय जनगणनेबाबत सर्वांचे मत जाणून घेऊ…

0
20231211_134327

जातीनिहाय जनगणनेबाबत सर्वांचे मत जाणून घेऊ…

नागपूर, दि. २० डिसेंबर :-

जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध दर्शविला असला तरीही महाराष्ट्रात अनेक जाती आणि धर्माची लोकं एकत्र राहतात. त्यांच्यात जातीय सलोखा कायम रहावा हीच सरकारची भूमिका आहे. जातीनिहाय जनगणेची मागणी होत असली तरीही याबाबत समाजातील सर्व घटकांचे म्हणणे जाणून घेऊन त्यानुसार सरकार योग्य तो निर्णय घेईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  स्पष्ट केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरच्या रेशीमबागेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृती स्मारकाला भेट देऊन त्यांनी पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्रपणे अभिवादन केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांवर चालणारे आणि विकासाचा ध्यास घेतलेले असे आमचे हिंदुत्त्व आहे. हाच हिंदुत्वाचा विचार अंगिकरून शिवसेनेचे मार्गक्रमण पुढे सुरू असून त्याच विचारांवर चालणारे आमचे सरकार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात आल्यावर इथे आवर्जून इथे भेट देत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. इथे आल्यावर अलौकिक शांतता आणि ऊर्जा मिळत असल्याचेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार संजय रायमूलकर, आमदार ज्ञानराज चौगुले हेदेखील यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *