खाजगी पोलिस प्रशिक्षण केंद्रासाठी SOP !
खाजगी पोलिस प्रशिक्षण केंद्रासाठी SOP !
मुंबई, दि. १५ डिसेंबर ;
महाराष्ट्रात सुरू असलेल्या व सुरू करण्यात येणार्या खाजगी पोलिस प्रशिक्षण केंद्रांसाठी सरकार एस.ओ.पी तयार करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रविंद्र वायकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.
आमदार रविंद्र वायकर यांनी नालासोपारा येथील विजय भव या नावाने चालविण्यात येणाऱ्या खाजगी पोलिस प्रशिक्षण केंद्रावर पोलिस भरती प्रशिक्षणाच्या नावाखाली चालकांकडून मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली होती, याप्रश्नी प्रश्न उपस्थित केले. यात अशा प्रकारे राज्यात किती अनधिकृत पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू आहेत? अशा केंद्राबाहेर राज्य शासनाची भुमिका काय? संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कुठली कारवाई करण्यात आली. लैंगिक शोषण झालेल्या मुलींच्या भवितव्याबाबत शासनाची भुमिका काय?
यावर उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस यांनी, याप्रश्नी दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच ज्या ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारे खाजगी पोलिस प्रशिक्षण केंद्रे सुरू आहेत, याचा डाटा जमा करण्याच्या सुचना पोलिस स्टेशनांवर देण्यात येईल. अशाप्रकारे खाजगी पोलिस प्रशिक्षण केंदे सुरू असलेल्या व सुरू करणाऱ्यां साठी एस.ओ.पी सरकार तयार करेल, त्याचप्रमाणे लैंगिक शोषण झालेल्या पिडीतांना शासनाच्या योजना प्रमाणे मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासन गृहमंत्री यांनी नागपुर विधानसभेत दिले.
