कॉर्पोरेट क्षेत्राने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे.
कॉर्पोरेट क्षेत्राने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे.
मुंबई, दि. १० डिसेंबर ;
सामाजिक जबाबदारी कायदेशीररित्या बंधनकारक असलेल्या कोणत्याही कर भरण्यापेक्षा वेगळी आहे. जेव्हा आपण कोणताही कर भरतो तेव्हा समाज आपल्याशी जोडला जात नाही देशाच्या, समाजाच्या कल्याणासाठी मदत करतो तेव्हा अनेक व्यक्ती, समाज आपल्याशी जोडला जातो. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डस् वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार,द सीएसआर जर्नल एक्सलन्सचे अमित उपाध्याय, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास,माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री सिंह म्हणाले, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. परस्पर अवलंबिताची बंधने तोडून राहू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अडचणीवेळी मदत केली तर मदत करणाऱ्या व्यक्तीकडे किती संपत्ती आहे हे पहिले जात नाही. तर कोणत्या व्यक्तीने तातडीने मदत केली हेच पाहिले जाते. समाजात बंधुत्वाची, आणि मदतीची भावना असायला हवी जो समाज एकमेकांना मदत करतो तोच समाज देशाला पुढे घेऊन जातो आणि इतरांना पुढे येण्यासाठी सुद्धा प्रेरित करतो.त्यासाठी सामाजिक जाणीव असलेल्या लोकांचे, विशेषत: कॉर्पोरेट्स क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांच्या सामजिक योगदानाबद्दल कौतुकच केले पाहिजे.
यावेळी मंत्री सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीकांत शिंदे, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. भास्कर चटर्जी, आयकर आयुक्त विकास अग्रवाल, सहआयुक्त निधी चौधरी, सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, माजी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस सहारिया, माजी सनदी अधिकारी दीपक सानन,माजी सनदी अधिकारी अजितकुमार जैन, एबीपी माझा मुख्य संपादक राजीव खांडेकर, आयकर विभागाचे आयुक्त सुमित कुमार,एनआरएलएम मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना झा त्रिपाठी, माजी सनदी अधिकारी डॉ. प्रदीप व्यास,
टाटा सामाजिक विज्ञान संस्थांचे प्र-कुलगुरू बिना पॉल, इरा खान, सुहानी शहा या मान्यवरांना शिक्षण, कौशल्य विकास व प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण, बाल कल्याण, सायबर सुरक्षा, पर्यावरण, कृषी, ग्रामीण विकास, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या अधिकाऱ्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.तसेच मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते दुर्गम भागात आदिवासी समाजाच्या कल्याणासाठीकाम करणाऱ्या सामजिक करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
