20200905_123522
मुंबई, दि. ५ सप्टेंबर २०२०:
समाज घडवण्याऱ्या शिक्षकांनी कोरोना योध्दे म्हणूनही मोलाचे कार्य केले. पण राज्य सरकारकडून शिक्षक दिनी ना त्यांचे कौतुक, शुभेच्छा, ना यावेळी आदर्श पुरस्कार देण्यात आले. शिक्षक दिनी राज्य सरकारने “कोविड योद्धया शिक्षकांना” पुरस्कार, सन्मान, वेतन, सेवा सुविधांबद्दल आश्वस्त केले नाही अशी खंत माजी मंत्री व भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
शिक्षकांबद्दल सरकारी अनास्थेवर बोलताना शेलार म्हणाले, धुळ्यात एकाच दिवशी दोन शिक्षकांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली? महाराष्ट्रातील शेतकरी आणि शिक्षकांच्या या घटना चिंताजनक आहेत. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे होते. पण तसं झाले नाही. शिक्षकदिनी बहुधा सरकारने दाद न दिल्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पक्षातर्फे जाहिरात देऊन शिक्षकांना शुभेच्छा द्याव्या लागल्या, असा टोला त्यांनी लगावला.
कोरोनाच्या संकटात डॉक्टर, पोलिस, आशा सेविका, महसूल कर्मचारी, सफाई कामगार यांच्यासह ज्यांचा कार्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल ते म्हणजे शिक्षक. शिक्षकांना नेहमीप्रमाणे यावेळीही शालेबाह्य कामाचे ओझे टाकण्यात आले.  प्रत्यक्ष शाळा सुरु नसल्या तरी ऑनलाईन सुरु आहेतच. त्यात भर म्हणजे मुलांना घरोघरी जाऊन पुस्तक व शालेय साहित्य देण्याचे काम, यातून काही शिक्षकांना कोरोनाचे संक्रमण झाले. हे काम एवढ्यावरच थांबले असते तर ठिक परंतु शिक्षकांना क्वारंटाऊन सेंटरची ड्युटी लावलेली, घरोघरी जाऊन कोरोना पेशंटचा शोध घेणे तसेच चेकपोस्टवरही ड्युटी लावण्यात आली. एवढे करुनही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. पगार, बदल्या, शाळाचे अनुदान, पेन्शनसाठी झगडणे यातून सुटका झालेली नाही.कोरोना योद्धे म्हणून डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ, पोलीस व इतर कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जात असताना , त्यांच्या कार्याला सलाम केला जात असताना त्यांच्याच बरोबरीने या शिक्षकांनी केलेल्या कामाची दखल सरकारने घ्यायला हवी होती, पण त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यास राज्य सरकारला विसर पडावा हे खेदजनक आहे. फक्त Thank A Teacher अशी ऑनलाईन मोहिम चालवून शिक्षकांप्रती कोरडा आदरभाव व्यक्त केल्याने त्यांच्या समस्या सुटणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *