खा. सुनील तटकरे यांना अपात्र करा..
खा. सुनील तटकरे यांना अपात्र करा..
मुंबई, दि. ५ नोव्हेंबर;
पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल तर मला त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहून केली आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, फैजला तुम्ही पाहिले की, आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागली आणि मगच फैजल या आमच्या लक्षद्वीपच्या खासदारांना न्याय मिळाला. आम्ही पक्षाच्या साठी न्याय मागतोय आणि ज्या व्यक्तीने महिला विधेयक हे भारतातला एक ऐतिहासिक विधेयक होतं. त्या विधेयकाच्या वेळी उपस्थिती नव्हते. सुनील तटकरे यांच्या विरोधात पक्षविरोधी कृतीची याचिका करून आता जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटूनही गेला आहे. मात्र, अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी खंत सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच यावरील कार्यवाही इतक्या कालावधीपासून प्रलंबित आहे, कार्यवाही केली जात नाही, यामुळे शेड्युल (सूची) दहाचे उल्लंघन होत आहे.
“अदृश्य शक्ती, दिल्लीमध्ये अदृश्य शक्ती आहे. त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. हे सर्व कोणाच्या जिवावर चालले आहे. ते सर्व दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या जीवावर चालले आहे. अदृश्य शक्ती त्यांच्या मागे उभी राहिली आहे. त्यामुळे तर हे सर्व सुरू आहे. अदृश्य शक्ती नसतील तर हा सर्व खेळ जमला असता का? हे सर्व दुसऱ्यांच्या जीवावर चालले सगळे. ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण आणि खचीकरण म्हणजे फक्त राष्ट्रीय पक्ष नाही. रोजगारामध्ये महाराष्ट्राचे देशात महत्व कसे कमी होईल, हे मोठे कट कारस्थान हे अदृश्य शक्ती दिल्लीवरून महाराष्ट्राच्या विरोधात काम करते. हे मी डेटानुसार सांगू शकते. मी त्यांच्यासारखे कधीही खोटे आरोप करत नाही. मी वास्तवतेत जगते. मी डेटानुसार सांगू शकते की, अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कशी आहे”.
