खोके घ्यायला वेळ आहे पण आरक्षणासाठी नाही.
खोके घ्यायला वेळ आहे पण आरक्षणासाठी नाही.
मुंबई, दि. ३० ऑक्टोबर:
मराठा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ४० दिवस सांगितलं होतं. मराठ्यांनी वेळ देऊन देखील काही निर्णय झाला नाही त्यामुळे आज जी काय परिस्थिती आहे त्याला जबाबदार हे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे. खोके घ्यायला या लोकांना वेळ आहे पण मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज यांच्यासाठी वेळ नाही. जनतेची फसवणूक करण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केलेले आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
आज जे महाराष्ट्रात अस्थिर वातावरण आहे, हे फक्त हे ट्रिपल इंजिन खोके सरकारचं पाप आहे. लोकांना फसवायचं लोकांना दुखवायचं सत्तेचा गैरवापर करायचा या सरकारकडे सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी वेळच नाही आहे.
या राज्याचे गृहमंत्री करताय तरी काय? राज्याच्या गृहमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. मला असं वाटतं राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही सर्व रेकॉर्ड काढून बघा गेले एक महिन्याभर सातत्याने मी गृहमंत्रालयासोबत पत्र व्यवहारकरून सांगत आहे. आज एका आमदाराच्या घरावर असा हल्ला होणार असेल तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. ही गृह मंत्रालयाची आणि यात ट्रिपल इंजिन खोके सरकारची नैतिक जबाबदार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
