मुंबईतील सहा हजार कोटींची कामे पडूनच !

0
20220519_112635

मुंबईतील सहा हजार कोटींची कामे पडूनच !

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर ;

शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका रस्ते घोटाळा, फर्निचर घोटाळयाबद्दल महानगरपालिका आयुक्तांना प्रश्न उपस्थित करत, पालिका प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या सिंडिकेट बद्दल आवाज उठवत महापालिका आयुक्तांनी कोणती कारवाई केली असा जाब विचारला आहे.

गेले १० ते १२ महिने आम्ही रस्त्यांचा विषय मांडतोय. ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत तिथे घोटाळे सुरु आहेत. मुंबईत ५ कॉन्ट्रॅक्टर आहेत…त्यांपैकी एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मीनेशन नोटीस गेली…या नोटीशीला कंत्राटदारानं उत्तर दिलं…त्याची सुनावणी महापालिकेत या आठवड्यात होणार आहे.

या सुनावणीनंतर कंत्राटदारावर कारवाई होते की खोके घेऊन कारवाई थांबवली जाते हे आम्हाला बघायचे आहे. मुंबईत रस्त्याची कामे १ ऑक्टोबर ते ३१ मे पर्यंत पूर्ण होतात. पण मुंबईत अद्याप एकाही रस्तेकामाला सुरुवात झालेली नाही. अडीच हजार कोटींची कामे तशीच्या तशी पडून आहेत

 

ट्रॅफिक पोलिसांच्या एनओसी न मिळाल्याचे दाखवून रस्ते कामे रखडवली जातायेत. मोठा गाजावाजा करुन सहा हजार कोटी रुपयांच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला पण ती कामेही पडूनच आहेत असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *