शेतकरी पुत्र शिंदे व मुंडेंची संवेदनशीलता हरपली काय ?

0
images - 2023-09-14T165513.599

शेतकरी पुत्र शिंदे व मुंडेंची संवेदनशीलता हरपली काय ?

मुंबई, २६ ऑक्टोबर :

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवतात मात्र दुष्काळ जाहीर करीत नाहीत तर दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची कणव असल्याचे भासवणाऱ्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना मनोज राठोड या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाला पक्ष कार्यालयात बोलावून माध्यम प्रतिनिधी आणि पक्ष कार्यकर्त्यांसमोर त्यांच्या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली. मात्र आज दोन महिने उलटून गेले असताना या कुटुंबियांची साधी विचारपूस करण्यासाठी या कालावधीत कोणी त्यांच्याकडे गेले नाही. या मुद्यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला असून ‘स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवून घेणारे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता हरपली काय असा सवाल उपस्थित करत चांगलंच धारेवर धरलं आहे.

श्री विजय वडेट्टीवार आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, जाहिरातबाजी साठी स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेण्याची शर्यत सरकारमधील मंत्र्यांमध्ये लागली आहे. दसरा मेळावा भाषणात मुख्यमंत्री ओरडून ओरडून स्वतःला शेतकरी पुत्र असल्याचे सांग होते. त्यांच्याआधी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ येथील आत्महत्या केलेले शेतकरी मनोज राठोड यांच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याची घोषणा केली आणि स्वतःला संवेदनशील शेतकरी पुत्र म्हणत जाहिरातबाजी केली.आता दोन महिने होऊन गेले पण कुटुंबीयांकडे कोणी गेले नाही, फोन वर विचारणा ही केली नाही. स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेणारे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देऊ शकत नाही. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिलेला शब्द पूर्ण करू शकत नाही.मदत करायची नाही तर करू नका पण किमान लोकांच्या भावनांशी तरी खेळू नका असं वडेट्टीवार यांनी म्हंटल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *