20200904_092237

मुंबई, दि. 4 सप्टेंबर 2020:

चर्चेत राहण्यासाठी सतत वाह्यात बडबड करणारी बॉलिवूड नटी कंगणा राणावत हिने मुंबई पोलीस व त्यानंतर मुंबईबद्दल बडबड केल्याने ती मुंबईकरांच्या डोक्यात गेली आणि मुंबईकरांची पण सटकली. सुशांत आत्महत्या प्रकरणात दररोज काही ना काही वादग्रस्त बोलणारी या नटीने आता आपल्या अकलेचे तारे तोडत मुंबईला पाकव्याप्त काश्मीर करुन टाकले. ज्या मुंबईत येऊन नाव कमावले पैसा कमावला, प्रसिद्दी मिळवली. त्याच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केल्याने मुंबईकर संतापलेत.
कंगणाच्या बडबडीचे राजकीय पडसाद उमटले.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तिचा समाचार घेतला. मुंबई पोलीसांची भीती वाटत असेल तर मुंबई येऊ नका. पुरावे असतील तर मुंबई पोलिसांना द्या, मुंबई पोलीसांची बदनामी करू नका असे सुनावले. काँग्रेसच्या सचिन सांवत म्हणाले, ज्या थाळीत खायचे त्याच थाळीत घाण करायची ही प्रवृत्ती आहे तर माजी खासदार निलेश राणे यांनी, मुंबई पोलिसांची बदनामी खपवून घेणार नाही असे सुनावले.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी कंगनाविषयी संताप व्यक्त केला. पाकव्याप्त काश्मीरसोबत मुंबईची केलेली तुलना धक्कादायक आहे! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” असा सणसणीत टोला लगावला.
सोशल मीडियावरही कंगणा ट्रोल झाली. अनेकांनी कंगणाच्या बडबडीला उत्तर देत, ‘मुंबई मेरी जान’ असे म्हटले तर मुंबईने आपणास कशी ओळख दिली याचे वर्णनही केले.
मुंबई नेहमीच बाहेरील राज्यातील नागरिकांना आपलेसे करते. ते इथं पैसा, प्रतिष्ठा, मान सन्मान कमवतात आणि त्या बदल्यात मुंबईला परत काय देतात? असा संतप्त सवाल नेटक-यांनी केला आहे. मुंबई शहर हे सर्वात सुरक्षित असून रात्री अपरात्री कधीही मुंबईच्या रस्त्यावर सुरक्षित वाटते असे काही महिला नेटकरी म्हणाले.
#आमचीमुंबई  #कंगणा_रनौट_चल_निकल_पड , हे हॅशटॅग तुफान ट्रेंड करत असून, नेटक-यांनी कंगणाला भरपूर सुनावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *