गरब्यासाठी एक दिवस वाढीव वेळ द्या..

0
images - 2023-10-12T194531.057

गरब्यासाठी एक दिवस वाढीव वेळ द्या..

मुंबई, दि. १९ ऑक्टोबर  –

सध्या नवरात्रीचे दिवस सुरू असून गरब्याचा आनंद तरुण-तरुणी लुटताना दिसत आहेत. मात्र अपुऱ्या वेळेमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडताना दिसून येत आहे. त्यामुळे उत्तर मुंबई विभागातील गरबा रसिकांना गरबा खेळण्यासाठी अधिक एक दिवस वाढीव वेळ द्यावा, अशा मागणीचे निवेदन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

 

दरेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, नवरात्री उत्सव 2023 निमित्त गरबा रसिकांना गरबा खेळण्यासाठी उत्तर मुंबईत १० ते १२ मोठ्या गरब्यांचे आयोजन करण्यात आले आहे. एका सार्वजनिक गरब्यामध्ये दिवसाला एक ते दीड लाख गरबा रसिक गरबा खेळण्याचा आनंद घेत आहेत. परंतु गरबा रसिकांची कामावरून घरी परतण्याची वेळ आणि गरबा बंद होण्याची वेळ यात खूप कमी अंतर असल्यामुळे वेळेअभावी त्याचा पुरेपूर आनंद घेता येत नाही.

 

गरबा रसिकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वाढवून दिलेली वेळ ही दोन दिवसा ऐवजी तीन दिवस करावी. कारण वाढवून देण्यात आलेला दिवस शनिवार येत आहे व दुसऱ्या दिवशी रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्व गरबा रसिक गरबा खेळण्यासाठी उत्सुक आहेत. तरी गरबा रसिकांना गरबा खेळण्यासाठी अधिक एक दिवस वाढवून द्यावा, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *