… पुन्हा असे घडले तर गालावर वळ उठतील!

0
images (18)

… पुन्हा असे घडले तर गालावर वळ उठतील!

मुंबई, दि. २९ सप्टेंबर ;

मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारण्याच्या प्रकारावर राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत मराठी माणसावर अन्याय करणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा असे काही घडले तर गालावर वळ उठतील हे निश्चित आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

 

मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला.

मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *