लंडनमध्ये बाबासाहेबांचे स्मारक व वसतीगृह उभारा.

0
IMG-20230914-WA0120

लंडनमध्ये बाबासाहेबांचे स्मारक व वसतीगृह उभारा.

मुंबई दि. १५ सप्टेंबर –

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील हेन्री रोडवर संग्रहालय स्वरूपात स्मारक आहे. मात्र लंडनमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्याची येथील आंबेडकरी जनतेची मागणी आहे. लंडनमध्ये लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. तिथे भारतीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभरण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे आपण यासाठी प्रयत्न करू असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

 

 

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाला रामदास आठवले यांनी भेट दिली. त्यावेळी लंडन मधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोरासामी यांनी रामदास आठवले यांचे स्वागत केले. लंडनमधील भरतीय उच्चायुक्त विक्रम दोरासामी  यांच्याशी रामदास आठवले यांनी यावेळी  विविध विषयांवर चर्चा केली. लंडन मधील विविध मागण्यांसाठी भारत सरकार कडे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पुढे आले.

 

लंडनमधील आंबेडकर सेंटरचे गौतम चक्रवर्ती, एच एल विरधी, कुमार जित आठवले, युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, इंटरनॅशनल फॉरम फॉर अँटी करप्शनचे उपाध्यक्ष तौसिफ पाशा फजल आदी उपस्थित होते.

 

लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयाशेजारीच लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सचे संकुल आहे. याच लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 मध्ये द प्रॉब्लम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिला होता. त्या प्रबंधाला आता 100 वर्षे पूर्ण झाली असून त्या निमित्त येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सूचना ना.रामदास आठवले यांनी केली. तसेच लंडन मधील आंबेडकरी कार्यकर्त्यांची एक समिती नियुक्त करुन येथील आंबेडकर सेंटर द्वारे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे.14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन, बुद्ध पौर्णिम, 6 डिसेंम्बर ला महापरिनिर्वाणदिन अश्या महत्वपूर्ण दिनी लंडन मध्ये आंबेडकर सेंटर तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे.या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार ने 2 कोटींच्या निधीची तरतूद करावी अशी सूचना रामदास आठवले यांनी केली.

यावेळी भारतीय उच्चायुक्तालयात आणि लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स दोन्ही ठिकाणी असलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला रामदास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *