आम्ही ईडीला घाबरलो नाही पण मुश्रीफ घाबरले!

0
FB_IMG_1693028597461

आम्ही ईडीला घाबरलो नाही पण मुश्रीफ घाबरले!

कोल्हापूर, दि. २६ ऑगस्ट –

आजचं राजकारण कसं बदलतं आहे ते आपण पाहात आहोत. ईडीचा धाक दाखवला जात आहे. तो धाक दाखवल्यामुळे काहींनी भूमिका बदलली. कोल्हापुरात काही लोकांना ईडीची नोटीस आली. मला वाटलं की कोल्हापुरचे लोक स्वाभीमानी, शूर असतील पण तसं धाडस त्यांनी दाखवलं नाही. भगिनींनी म्हटलं की आम्हाला असा त्रास देण्यापेक्षा गोळ्या घाला. त्या भगिनींनी धाडस दाखवले पण घरातील प्रमुख घाबरले अशी टीका हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

सरकार सत्तेचा वापर हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास कसा देता येईल यासाठी करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सांगण्यात आले आमच्या गटात या, आमच्या पक्षात या नाही तर तुमची जागा तुरुंगात असेल. त्यांनी आपली भूमिका सोडली नाही म्हणून 14 महिने त्यांना तुरुंगात टाकले. सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकले. नवाब मलिक केंद्र सरकारच्या चुकीच्या कारभारावर टीका करत होते. त्यांनाही तुरुंगात टाकले. आता दोन महिन्यांसाठी त्यांना जामीन मिळाला आहे. त्यांना वाटले आम्ही घाबरून जाऊ. मलाही निवडणुकीच्या आधी ईडीची नोटीस आली. ते म्हणाले उद्या या मी म्हणालो आजच येतो. ज्या प्रकरणात मला ईडीची नोटीस आली ती एका बँक व्यवहारातून आली होती. त्या बँकेत माझं खातंही नव्हतं. तेव्हा आपली बाजू सत्याची असेल तर आपल्याला घाबरण्याचे कारण नाही.

तुम्हाला शिवसेना चालते मग भाजप का नाही असा प्रश्न वारंवार विचारला जातो. यावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरेंचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले शाहू महाराज बेडला खिळले होते. ते प्रबोधनकार ठाकरेंना कोदंड म्हणायचे. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना बोलावून घेतले. त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांच्याकडे प्रतापसिंहराजेंचा खरा इतिहास समोर आणण्यास सांगितले. त्यानुसार प्रबोधनकारांनीही तो इतिहास समोर आणला. यातून शिवसेनेचे हिंदुत्व मानवतावादी आहे, तर भाजपचे हिंदुत्व हिंसावादी आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेना मान्य आहे असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

अनिल देशमुख बोलताना म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतले आपले सहकारी आपल्याला सोडून भाजपाबरोबर गेले आणि त्यांच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. शरद पवारांच्या आशीर्वादाने मोठे झालेले हे लोक आता शरद पवारांना सोडून गेले आहेत. मुळात हे लोक का सोडून गेले? केवळ ईडीच्या धाकाने हे सगळे लोक पळून गेले. परंतु ईडीची भीती तर मलाही होती. ईडीचा धाक मलाही दाखवला होता. मला म्हणाले आमच्याशी तडजोड करा परंतु मी त्यांना म्हटलं आयुष्यभर तुरुंगात राहीन पण तुमच्याबरोबर सौदा करणार नाही.

छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा विचार महाराष्ट्राने मान्य केला आहे मात्र अधून मधून त्याचं विसर होत आहे. आपला विचार काय आहे हे बघण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर जिल्हा हा सदैवराष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे म्हणजे शरद पवार साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे सदैव उभा राहिलेला आपण पाहिला आहे सध्या नवीन मंत्री झालेल्यांना मी विचारलं होतं की तुमचा विचार कसा काय बदलला आणि कधी बदलला हे मला तुम्ही सांगा मात्र अधिवेशन झाले असताना देखील अद्यापही त्यांनी मला ते सांगण्याकरिता वेळ त्यांना मिळाला नाही आहे त्यामुळे आता हा जाब आपल्याला त्यांना विचारावा लागेल.

कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात पुरोगामी जिल्हा आहे आणि महाराष्ट्र म्हणजे भारतामध्ये सर्वात पुरोगामी राज्य आहे. जे कोल्हापूर मध्ये घडून ज्याची सुरुवात होते तेच संपूर्ण महाराष्ट्रात घडते आणि ते भारतात देखील घडतंय ते अलीकडच्या काळात दिसून येत नाही ते आता आपल्याला दुरुस्त करायचे आहे त्यासाठी शरद पवार साहेबांनी हा जो विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे त्याच्या मागे आपण सर्वजण उभे राहण स्वाभिमानी नेता कसा काम करतो आणि अभिमानी नेता कसा वेगळा काम करतो यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्याला आज फुले शाहू आंबेडकर यांचा विचार महत्त्वाचा ठरत आहे असे छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटले आहे.

 

 

पुण्यातील लोकायात नावाची सामाजिक संस्था मधील कार्यकर्त्यांनी या देशाची लोकशाही टिकवावी याकरिता दोन लाखाचे पगार असलेल्या नोकऱ्यांवर पाणी फिरून जनजागृतीचे काम 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत करत आहे. या संस्थेमध्ये आयआयटी पास झालेले आणि तीन लाख रुपये महिन्याला पगार घेणारे स्वप्नील आणि त्यांचे सगळे सहकारी आहेत. पण मागच्या वर्षभरापासून तर पुढच्या 2024 पर्यंत दोन लाखाच्या नोकरीवर पाणी सोडून पुढची दोन वर्षांनी देशासाठी द्यायचे आहे. लोकशाही विरोधात काम करणाऱ्या त्या विरोधात आवाज उठवायचा म्हणून जनजागृती करत आहे या सर्वांनी स्वाभिमानी सभेमध्ये जनजागृती करण्यासाठी गाणे देखील गायले त्यानंतर पवार साहेब यांनी त्यांचे स्वागत देखील केले. असे देखील छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *