कांद्यापाठोपाठ आता साखर निर्यात बंद !

0
FB_IMG_1693028623431

कांद्यापाठोपाठ आता साखर निर्यात बंद !

कोल्हापूर, दि. २६ ऑगस्ट –

सध्या देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत आहेत. कांद्यावर केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात कर लावला. हे अन्यायकारक आहे. असे असतानाच मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही कृषीमंत्री असताना कांद्यासाठी काय केले? तर मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की मी कृषी मंत्री असताना कांद्यावर कधीही निर्यात कर लावला नाही. जिरायत शेतकरी कांदा पिकवतो. त्या शेतकऱ्याच्या कांद्याला अधिक किंमत कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार असे कृषी मंत्री असताना लोकसभा अध्यक्षांना सांगितले होते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानी सभा कोल्हापूर येथील दसरा मैदानात आयोजित करण्यात आली होती या सभेचे अध्यक्ष स्थानिक छत्रपती शाहू महाराज होते.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार डुंकून बघायला तयार नाही. यवतमाळ जिल्ह्यातील 18 दिवांसत 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असे असतानाही त्या प्रश्नाकडे पाहले जात नाही. कांद्यापाठोपाठ आता केंद्र सरकार साखर निर्यात बंद करण्याचे प्रयत्न करणार आहे. तर काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एक वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत कडक उन्हाळ्यात शेतकरी रस्त्यावर बसले होते. मोदी सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांनी त्या शेतकऱ्यांकडे डुंकूनसुद्धा पाहिले नाही. शेतकऱ्यांचा एवढा अपमान इतिहासात कोणत्याच सरकारनी केला नाही. तेव्हा अशा सरकारला सत्तेवर ठेवायचे की नाही याचा निर्धार तुम्हाला करायचा आहे.

आपल्याला आपल्या राज्यातील तरुणांच्या हाताला काम द्यायचे आहे. त्यासाठी कारखाने आले पाहीजे असे असताना महाराष्ट्रात येणारे कारखाने गुजरातला नेले जात आहेत. इथल्या तरुणांना मिळणारी संधी घालवली जात आहे. याकडेही उघड्या डोळ्यांनी बघितले पाहीजे असेही यावेळी शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार पूढे म्हणाले की, मिळालेली सत्ता सामान्यांसाठी वापरायची असते हे कोल्हापुरनं आपल्याला सांगितलं. शिवाजी महाराजांनी असं राज्य उभं केलं जे भोसल्यांचं राज्य नव्हतं तर ते रयतेचं राज्य होतं. दुसरे एक राजे या देशात होऊन गेले ज्यांनी आपली सत्ता घेऊन समाजाच्या बाजूनं राहिलं. त्यांनी चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला नाही. ढोंगी लोकांना त्यांनी कधी संमती दिली नाही भोंदूहगिरीचा पुरस्कार शांहूंनी कधी केली नाही ते म्हणजे शाहू महाराज, अशा शब्दांत त्यांनी शाहू महाराजांचा दाखला देताना भाजपवर टीका केली.

 

भारतानं चांद्रयान-3 हे चंदाच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँड केलं आहे. भारतानं हा विश्वविक्रम रचल्यानं अनेक स्तरांतून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एकीकडे आपण चंद्रावर पोहोचलो मात्र दुसरीकडे आपली जनता महागाईने त्रस्त आहे असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देशाकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या होत्या. आपलं चांद्रयान-3 यशस्वी लँडही झालं आपल्या देशातील तज्ज्ञांनी अशक्य ते शक्य करुन दाखवलं. ही कामगिरी करण्यात महत्त्वाचा वाटा कोणाचा आहे तर इस्रोची स्थापना करणाऱ्या पंडीत नेहरू यांची. तसंच, इंदिरा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, अटलबिहारी वाजपेयी किंवा नरेंद्र मोदी असोत, या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज ही इस्रो संघटना जगात महत्त्वाची ठरली आहे. इस्रोने आज हे चांद्रयान तयार केलं परंतु ते तयार करण्यासाठी विक्रम साराभाई, सतीश धवन अशी अनेक नाव सांगता येतील, ज्यांचं यात योगदान आहे आणि त्यामुळे भारतानं आज चंद्राला गवसणी घातली आहे असेही यावेळी शरद पवार साहेब यांनी स्पष्ट केले आहे

मणिपूरमध्ये दोन समाजात संघर्ष आहे. तेथे जाळपोळ सुरू आहे. तेथील आया बहिणींची नग्न धिंड काढली जाते. तरीही त्या आया बहिणींसाठी मोदी सरकारकडे वेळ नाही. संसदेत या विषयावर बोलण्यास त्यांच्याकडे वेळ नाही. तेव्हा आपल्याच देशातील आया-बहिणींची अब्रु सांभाळण्याची ज्यांच्याकडे ताकद नाही त्या मोदी सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *