शरद पवारांच्या भूमिकेचा अर्थ कळायला काळ लागतो.
शरद पवारांच्या भूमिकेचा अर्थ कळायला काळ लागतो.
मुंबई, दि. २५ ऑगस्ट :
अजित पवार राष्ट्रवादी पक्ष म्हणून सोबत आहेत असे सांगताहेत आणि शरद पवार समर्थन करत असतील तर त्याचे स्वागतच होईल. परंतु शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेचा अर्थ कळायला काही काळ जायला लागतो. त्यामुळे खरे काय, खोटे काय हे येणारा काळ स्पष्ट करील, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
अजित पवार यांनी घेतलेली भुमिका योग्य आहे, त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थन आम्हाला आहे ते खरे ठरेल. परंतु त्याचवेळेला द्विधा वातावरण निर्माण करण्याचे काम पवारांची कुठलीही भुमिका करत असते. एका बाजूला आमचे फोटो लावायचे नाहीत अशा प्रकारच्या सूचना जातात याचा अर्थ काय आहे. जर पक्ष एक आहे, अजितदादा आपले नेते आहेत आणि पवार साहेबांना ते दैवत मानत असतील तर फोटोच्या आक्षेपाचे काही कारण नाही.
आमच्यासाठी ही स्वागताहार्य भुमिका असली तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. ते नेमके आपल्या भूमिकेतून काय सांगणार आहात. पक्ष एकच आहे तुम्ही वादविवाद करू नका, संघर्ष करू नका, सगळ्यांनी सगळ्यांचे फोटो लावा. कार्यकर्त्यांची अवस्था तुम्ही समजून घेत नाही.
जनतेला काय वाटते याचा विचार करत नाही. कारण शेवटी जनतेच्या जीवावर आपण राजकारण करतो. त्यामुळे स्वतःच्या राजकारणासाठी एका बाजूला परिवार एक आहे म्हणायचं, दुसऱ्या बाजूला भुमिका विरोधात घेऊन सभा घ्यायच्या. अशा प्रकारचे राजकारण शरद पवार यांनी सातत्याने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजित पवार यांनी समर्थन दिले आहे. त्यांच्या एवढा देशाला पुढे नेणारा नेता कुणी नाही, असेही दरेकर म्हणाले…
