शरद पवार आता कोल्हापूरच्या आखाड्यात !

0
IMG-20230402-WA0038

शरद पवार आता कोल्हापूरच्या आखाड्यात !

मुंबई, दि.  २५ ऑगस्ट;

नाशिक व बीड नंतर शरद पवारांनी कोल्हापूरकडे मोर्चा वळवला आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात आज सभा पार पडणार आहे. ही सभा विविध गोष्टींमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या सभेचा एक टिझर जाहीर केला आहे. या टिझरची प्रचंड चर्चा सध्या सुरू आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून हा टिझर अपलोड करण्यात आला आहे. यावर ‘आपलं नाणं खणखणीत आहे आणि हे नाणं भल्याभल्यांचा आवाज बंद करणार, कारण कोल्हापूरच्या आखाड्यात शड्डू पवार साहेबच ठोकणार! असा मजकूर लिहिण्यात आला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्ततेचं वातावरण आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे 25 आणि 26 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांची दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती शहराध्यक्ष आर के पवार यांनी दिली आहे. 25 तारखेला साताऱ्यातून ते कोल्हापूरमध्ये दुपारी अडीच वाजता येणार आहेत. तेथून ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला देऊन वंदन करणार आहेत. यानंतर संध्याकाळी पाच वाजता दसरा चौकात त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, श्रीनिवास पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *