ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन..
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन..
मुंबई, दि. २४ ऑगस्ट :-
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानं मराठी, हिन्दी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आपल्या सहज, सोज्वळ, सात्विक अभिनयानं चित्रपटरसिकांच्या हृदयावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी अभिनेत्रीला आज आपण मुकलो आहोत.
गेल्यावर्षी, 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर दीड वर्षांनी सीमा देव यांचं झालेलं निधन ही देशभरातील चित्रपटरसिकांच्या, मराठी माणसाच्या मनाला धक्का देणारी घटना आहे. सीमा आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडद्यावरची आणि वास्तव जीवनातीलही पती-पत्नींची आदर्श जोडी होती. या जोडीकडे पाहत मागच्या पिढ्यातील अनेक दांपत्यांनी आपलं जीवन सुखी, समाधानी, आनंदी करण्याचा प्रयत्न केला.
सीमा देव यांचं निधन ही मराठी चित्रपटसृष्टीची, भारतील कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
