… म्हणून पवार स्वबळावर सत्ता आणू शकले नाहीत!

0
images (40)

… म्हणून पवार स्वबळावर सत्ता आणू शकले नाहीत!

मुंबई, दि. २२ ऑगस्ट ;

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रीय राजकारणात असलेला दबदबा  कमी करण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे त्यानुसार हे काही गोष्टी घडत आहे. पवारविरोधात अस्वस्थता निर्माण करायची, त्यांच्या जवळची माणसं त्यांच्या नेतृत्वाविषयी बोलतात. सर्व त्यांच्याकडून बळजबरीने बोलून घेण्यात येते की? माहित नाही परंतु पवारांची छबी खराब करण्याचा राष्ट्रीय प्लॅन आहे. त्यातील हा एक भाग आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ज्या व्यक्तींना अनेक वर्ष आमदार केलं, मंत्रीपद दिली ती व्यक्ती आज शरद पवार यांच्या कर्तुत्वाविषयी बोलत आहे. पवार राजकारण 52 वर्षापेक्षा अधिक आहेत; जे या व्यक्तींच्या वयाच्या इतके भी नाही आहे अशा व्यक्तींकडून पवारांविषयी बोलतात हे बालिशपणाच उत्तम उदाहरण आहे. पवार यांनी उभा केलेला पक्ष तुम्ही बळकवण्याचा प्रयत्न करत आहात .जर तुमच्यात धमक असेल तर स्वतःचा पक्ष तयार करून मैदानात या असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तुमच्यासारखी माणसं असल्याने स्वबळावर सत्ता आणू शकले नाहीत. कोणतीही निवडणूक असो किंवा युद्ध असो त्यामध्ये सरदारांचे महत्त्व अधिक असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्याची स्थापना करताना सरदार चांगले मिळाले म्हणून स्वराज्य स्थापन करण्यात आले. मात्र तुमच्यासारखे सरदार असल्यामुळेच शरद पवार यांना एक हाती सत्ता आणता आली नाही. तुमच्यासारखे लोक बरोबर असतानासुद्धा साहेबांनी राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान मिळवले आहे, चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद देखील भूषवले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की तुमच्यासारखे माणसं जवळ असल्याने शरद पवार साहेब देशाचे नेते कसे काय होऊ शकतात तुमचं कर्तुत्व काय आहे हे तर सांगा. पवार साहेबांमुळे तुम्हाला आमदार होता आलं पवार साहेबांमुळेच तुम्हाला अनेक सहकारी संस्थेमध्ये स्थान मिळालं तुमचं वैयक्तिक कर्तृत्व काय आहे असा प्रश्न देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे शरद पवार साहेबांच्या विरोधात तुम्ही बोललात म्हणून मला आज बोलावं लागत आहे जर तुम्ही असेच पवार साहेबांनविरोधात बोलत असाल तर मी सदैव तुमच्या विरोधात बोलणार. शरद पवार साहेबांनी ज्या व्यक्तीला आपला सरदार म्हणून ओळख दिली त्यांनीच आपली तलवार खाली टाकून तडजोड केली असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. शरद पवार साहेबांन विरोधात बोलताना पवार साहेबांनी तुम्हाला आजपर्यंत ज्या पदांवर बसवलं त्या पदांचा पहिले राजीनामा दिला पाहिजे पवार साहेबांविरोधात बोलल्याने तुम्हाला महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *