z_1472343924

मुंबईत २४ ठिकाणी आठवडी बाजार..

मुंबई, दि. १८ ऑगस्ट :

मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेत २४ विभागात मे २०२३ झालेल्या जनता दरबारात, महिला बचत गटाकडून व्यवसाय करण्यासाठी स्टॉलची मागणी करण्यात आली होती, त्या मागणीवर प्रत्येक वार्ड ऑफिसमध्ये आठवड़ी बाजाराचे नियोजन करण्याची सुचना स्थानिक प्रशासनाला केली होती, या सुचनेच्या अनुषगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील २४ विभागात आठवड़ी बाजाराचे आयोजन करण्यात येत आहे.

 

घाटकोपर पश्चिम एन वार्ड मधील सुचित्रा बिझनेस पार्क, बी. एम. सी. पार्किंग, पटेल चौक, घाटकोपर पुर्व येथे दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता आठवडी बाजाराचे उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्री लोढा म्हणाले, आठवडी बाजाराच्या माध्यमातुन महिला बचत गटाच्या महिलांना व्यवसाय वाढीसाठी बळ मिळेल व महिला अधिक सक्षम होतील. आठवड़ी बाजारात महिलांनी बनविलेल्या घरगुती वस्तुंची विक्री करण्यासाठी आठवड्यातुन शनिवार आणि रविवार असे दोन दिवस त्यांना जागा देण्यात येईल. प्रत्येक आठवड्याला ५० महिला बचत गटांना व्यवसायाची संधी मिळेल. व्यवसाय वाढीसाठी व्यापारी वर्गाला विशेष निमंत्रित केले जाणार आहे, ज्यामुळे महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तुंना व्यापाऱ्यांची साथ मिळेल.

आठवड़ी बाजारात महिला बचत गटाकडून त्यांनी बनाविलेल्या वस्तुंचे माहिती पत्रक ग्राहकांना देण्यात येईल, ज्यामुळे ग्राहक त्या वस्तु डायरेक्ट महिला बचत गटाला संपर्क करुन मागवू शकतात व त्यांचा व्यवसाय निरंतर चालु राहील. बी एम सी च्या माध्यमातुन वस्तीवस्तीत फलक लावून व स्पीकर च्या माध्यमातुन आठवड़ी बाजाराचे प्रचार करण्यात येत आहे. सोबतच सर्व महिला बचत गट सुद्धा घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. बी. एम. सी. व शासनाच्या माध्यमातुन महिलांना आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने उचलले गेलेले हे एक महत्वपूर्ण पाउल आहे, ज्यामुळे महिलांच्या मेहनतीला शासनाची साथ मिळत आहे असेही मंत्री लोढा म्हणाले.

घाटकोपर पश्चिम एन वार्ड मधील सुचित्रा बिझनेस पार्क, बी. एम. सी. पार्किंग, पटेल चौक, घाटकोपर पुर्व येथे दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता आठवड़ी बाजाराचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे हस्ते उद्धघाटन व दीपप्रज्ज्वलन होईल.महिला बचत गट महिलांच्या माध्यमातुन पुष्पसुमनासोबत स्वागतगीताने स्वागत त्यानंतर मंत्री स्टॉल ला भेट देतील..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *