महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही.
महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही.
बीड, दि १८ ऑगस्ट ;
जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी भूमीला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनीही आपल्या पित्याच्या स्वाभिमानाची परंपरा पुढे चालवली. महाराष्ट्र दिल्ली समोर कधीच झुकला नाही असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेत बोलताना म्हणाले आहे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी सुडाचे राजकारण नाही तर प्रेमाचे राजकारण केले. यामुळे आजही ते जनमानसात जिवंत आहेत; पण आज अनेकजण राजकीय स्वार्थापोटी सुडाचे राजकारण करत समाजात वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आराेपही त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरूगांत गेले. त्यांनी सुडाच्या राजकारणाविरोधी लढत देशातील युवकांपुढे वेगळा आदर्श घालून दिला आहे. धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये शरद पवार यांच्या स्वागतासाठी पोस्टर्स लावले. त्यांना आजही शरद पवारांच्या आशिर्वादाची गरज असल्याचे ऐकूण बरे वाटले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की जे गेले ते बरेच झाले. कभी कभी सैलाब आता है और सबकुछ बदल देता है तसाच आताही सैलाब आला आणि आमचा संदीप क्षीरसागर नेता झाला. नाहीतर तो तरी कधी नेता म्हणून पुढे आला असता. चांगल्या चांगल्यांना आपण आजपर्यंत छातीवर घेतले आहे. आले अंगावर घेतले शिंगावर हा शरद पवारांचा नियम आहे. आणि आपण सर्व त्यांचे चेले आहोत. डरेंगे नही तर लढेंगे. हा सगळा धनशक्ती विरोधात जनशक्तीचा मेळावा आहे. साहेबांचाच फोटो वापरायचा, आणि साहेबाच्याच नावाने दिशाभूल करायची अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. आता तुम्ही नाद केला आहे. अऱे संदीप तुझी आजी आज आकाशातून , प्रेमाने आनंदाने बघत असेल. कारण मला तुझ्याकडून बघून ही अपेक्षा नव्हती. पण तो ज्यावेळी खात्रीने सांगायचा की, साहेब, तुम्ही येऊन बघा, काय करतोय ते एकदा येऊन बघा. पण हा भगवानबाबाचा, वंजारी समाजाचा पोरगा तुला शब्द देतो की, बीडच्या लढाईत तु्झ्या खांदाला खांदा लावून लढेन. बबन गिते, शंकर बांगर आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहेत. हा बीड जिल्हा आपण पुन्हा हलवून टाकू हा साहेबांना शब्द देतो.
