गडचिरोलीचा विकास करणार नक्षलवादावर मात!
गडचिरोलीचा विकास करणार नक्षलवादावर मात!
गडचिरोली, दि. १६ ऑगस्ट ;
एटापल्ली येथील कोठी कोरणार (जि. गडचिरोली) येथे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या क्रांतिवीर बाबुराव शेडमाके पुलाचे उदघाटन केले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या पुलाचे बांधकाम सुरक्षाकर्मींच्या माध्यमातून केले. या पुलामुळे 16 गावांतील 5 हजार लोकांना फायदा होईल. पूल नसल्यामुळे या 5 हजार लोकांचा 4 महीने बाह्य जगापासून संपर्क तुटत होता. मात्र आता पुलामुळे पावसाळ्यातही या गावांचा बाहेरच्या जगाशी संपर्क अबाधित राहील. येथील स्थानिक आदिवासी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्यादेखील यावेळी जाणून घेतल्या व लवकरात लवकर त्या सोडविण्याचे आश्वासनदेखील दिले.
एटापल्लीचा हा भाग देश आणि विकासविरोधी नक्षलवादाने ग्रस्त आहे. या पुलाच्या बांधकामामुळे स्थानिक जनता आणि सुरक्षा कर्मचारी दोघांनाही फायदा होईल. ₹6 कोटी खर्चून बांधलेला हा पूल एटापल्ली परिसरातील अनेक गावांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करेल.
