आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध.
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध.
पालघर, दि. १० ऑगस्ट ;
जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असून शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येत आहेत. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवाना शुभेच्छा दिल्या.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजीव गांधी मैदान येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते दूरदृष्य प्रणाली मार्फत बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रत्येक घटकाला मान सन्मान आणि विकासाची संधी देण्याचे काम प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रेरणेने होत आहे. आपल्या राष्ट्रपती या आदिवासी समाजाच्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे त्या आपल्याला मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहेत.
आज क्रांती दिन ही आहे आणि ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांचा शुभारंभ झाला आहे. याचा उल्लेख करून स्वतंत्र चळवळीत आदिवासी बांधवांनी दिलेले यागदानाचे स्मरण करून मुख्यमंत्र्यांनी शहिद आदिवासींना नमन केले.
आदिवासी आश्रम शाळांचा कायापालट करण्यात आला आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी पूर्व परिक्षा केंद्र सुरू केले. 100 विद्यार्थ्यांना पीच डी साठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे. तिथे १७ संवर्गातील भरती ही स्थानिकांमधूनच करण्यात येईल.असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
