फ्लाईंग किस प्रकरणी भाजपा महिला मोर्चाचे आंदोलन.

0
IMG-20230810-WA0055

फ्लाईंग किस प्रकरणी भाजपा महिला मोर्चाचे आंदोलन.

मुंबई, दि १० ऑगस्ट ;

‘राहुल गांधी हाय हाय, महिलांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध असो, महिलांओ का ये अपमान नही सहेगा हिंदुस्तान’, ‘राहुल गांधी माफी मांगो’ अश्या घोषणा देत मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या वतीने संसदेत फ्लाईंग किस केल्याप्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर यांच्या नेतृत्वात मंत्रालयाशेजारील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

 

राहुल गांधी यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे की, रोड रोमिओ आणि त्यांच्यात काहीही फरक नाही. त्यांनी देशातील महिलांची माफी मागावी अशी तीव्र भावना

भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केली. मोर्चात शेकडो महिला निषेधाचे बॅनर घेवुन सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधींच्या विरोधातील घोषणांनी मंत्रालयाचा परिसर दणाणून गेला. या आंदोलनात स्वप्ना म्हात्रे, शलाका साळवी, बिंदू त्रिवेदी, श्रीकला पिल्ले, राजेश्री शिरवडकर, समिता कांबळे, रिटा मकवाना यांच्यासह भाजपा महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *