सर्व सार्वजनिक आरोग्य रुग्णालयात मोफत उपचार..
सर्व सार्वजनिक आरोग्य रुग्णालयात मोफत उपचार..
मुंबई, दि. ३ ऑगस्ट : –
राज्यातल्या जनतेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आज सरकट मोफत उपचार देण्याची घोषणा करून एक क्रांतिकारक निर्णय घेतला. मंत्रिमंडळाने एकमताने यावर निर्णय घेतला.
या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्नित राज्यातील सर्व २ हजार ४१८ आरोग्य संस्थांचा समावेश असणार आहे. याठिकाणी पूर्वी केसपेपर काढण्यासाठी आणि नंतर उपचारासाठी रुग्णांना बराच वेळ वाट पाहत बसावं लागत होतं. आता हा वेळ वाचणार आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये सर्व उपचार व तपासण्या सरसकट मोफत केल्या जाणार आहेत
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण करत असताना महाराष्ट्र शासनाने राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने तसेच Out of Pocket Expenditure शून्य करण्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
