आम्ही तिघांनी ठरविले तर महाराष्ट्रात बदल होईल !

0
IMG-20230730-WA0096

आम्ही तिघांनी ठरविले तर महाराष्ट्रात बदल होईल !

मुंबई, दि. ३१ जुलै;

महाराष्ट्रात असलेल्या ऐतिहासिक खजिन्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने अशा संस्थांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. आता सध्या आम्हाला राज्य शासनाशी बोलणे अवघड आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि मी सुद्धा येथे आहे. आम्ही तिघांनी जर ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.

वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सहा ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.

यावेळी शरद पवार साहेब म्हणाले की, मोडी विषयी उद्धव ठाकरेंना असलेली माहिती आणि त्यांच्या फोटोग्राफीची प्रशंसा केली. उद्धव ठाकरे यांना दुर्गभ्रमंती बाबत अतिशय माहिती आहे. ऐतिहसिक गोष्टी अनेक त्यांना माहिती आहेत. त्यांच्याकडे फोटो देखील आहेत. उध्दव ठाकरे यांच्याबद्दल खूप आस्था आहे ते उत्तम फोटोग्राफर आहेत अशा शब्दात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले वि.का. राजवाडे संशोधन मंडळ संस्थेच्या कार्याबद्दलही कौतुक केले आहे. धुळ्यात जे काम चालू आहे ते वाढवणे गरजेचे आहे. सध्या सरकारला सांगण अवघड आहे परंतू मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी जर ठरवलं तर काही अडचण येणार नाही असे सुद्धा शरद पवार साहेब यांनी यावेळी स्पष्ट केले आहे

राजवाडे संशोधन धुळे ही महत्त्वाची कामगिरी करत आहे . यामध्ये शिवकालीन दुर्ग इ. ही सगळी पुस्तके अतिशय अभ्यास पूर्ण लिहिली आहेत. प्राथमिक शाळेत असताना मी मोडी हे आम्हाला शिकायला मिळाले. मी दक्षिणेत गेलो तेव्हा हे मला पाहायला मिळाले होते. देखील पवार यांनी म्हटले आहे. मी मुख्यमंत्री असताना काही लोकांना या भाषेतील लिखाण संबंधात काही लोकांची नियुक्ती केली होती. मोडीतील जे लिखाण आहे त्याचे भाषांतर केले. साने गुरुजींच्या पुस्तकात असे अनेक उल्लेख आहेत. हा अतिशय दुर्मिळ खजीना आहे ह्या इतिहासाच्या पाऊल खुणांचे लिखाण केले गेले पाहिजेत आम्ही ह्या खजिनांचे जतन करण्यासाठी 50 लाखांचे अनुदान जाहीर करतो असे देखील शरद पवार साहेब यांनी यावेळी सांगितले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *