नोटरी नोंदणीच्या गैरवापरास आळा घाला !
नोटरी नोंदणीच्या गैरवापरास आळा घाला !
मुंबई दि. ३० जुलै :
नोटरीचा एक मर्यादित उपयोग आहे परंतु अनेक व्यवहार हे नोटरीकडे नोंदविले म्हणजे कोर्टात गेले आहेत असे म्हणून त्याचा मोठया प्रमाणात गैरवापर होताना दिसत आहे. कौटुंबिक तंटे, उसने घेतलेले पैसे यांसारख्या गोष्टी देखील नोटरीकडे नोंदविल्या जातात. त्यामुळे महसुल विभागाने अशा नोटरी नोंदवून घेणाऱ्यांची विधी व न्याय विभागाकडून चौकशी करावी. त्यांच्या कामाचे गैरवापर होऊ नये याकरिता शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून यासंदर्भात नियमावली तयार करून घ्यावी. ज्यामुळे गैरवापराला आळा बसेल. असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निर्देश दिले.
यावर महसूलमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी, विधी व न्याय विभागाशी समन्वय साधून आवश्यक ती उपाययोजना केली जाईल असे सांगितले.
विधानपरिषद सदस्या श्रीमती डॉ मनिषा कायंदे यांनी लक्षवेधी अंतर्गत अल्याळी जिल्हा पालघर येथील गुरचरण जमिनीवर बनावट कागदपत्रांद्वारे अतिक्रमण केल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी नोटरी नोंदणीच्या गैरवापराबाबत महसूल विभागास निर्देश दिले.
