20200831_173804
विठ्ठल दर्शन घेऊन आंबेडकरांचे आंदोलन.

पंढरपूर, दि. ३१ ऑगस्ट २०२०

राज्यातील मंदिर उघडा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत आंदोलन हाती घेतले होते. प्रकाश आंबेडकर यांनी याच मागणीसाठी आज पंढरपुरात येऊन आंदोलन केले. वारकरी सघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देत आंबेडकर हे पंढरपुरात आदोलनासाठी आले होते. आठ-दहा दिवसांत नियमावली तयार करुन मंदीरे उघडली जातील असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे त्यामुळे हे आंदोलन मागे घेत असल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले परंतु आश्वासन पूर्ण झाले नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊन आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला.

प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत १५ जणांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती. विठ्ठल दर्शनानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मंदिर, मशीद, बुध्दविहार सुरु केली जातील असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. त्यासाठी सरकार नियमावली तयार करत असून त्यासाठी आठ दिवस लागतील असे सांगितले आहे. पण जर आदेश आला नाही तर पुन्हा पंढरपुरात आल्याशिवाय राहणार नाही. वंचितच्या आंदोलनाला यश आले असून लोकभावनेचा आदर केला म्हणत त्यांनी सरकारचे आभार मानले.
आंबेडकर यांनी भाजपवरही सडकून टीका केली. भाजपने घंटानाद करण्यापेक्षा केंद्र सरकारला सांगावे आणि मंदिरं खुली करण्याचे आदेश देण्याची मागणी करावी, असे ते म्हणाले. वंचितच्या आंदोलन लक्षात घेऊन पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलीस बंदोबस्त असला तरी आंदोलन करणारच अशी भूमिका आंबेडकर यांनी घेतली होती. या आंदोलनला एक लाख लोक येतील असा दावा करण्यात आला होती परंतु पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केल्याने शेकडो कार्यकर्त्यांना पंढरपुरात येता आले नाही. पंढरुरातील या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळावा मात्र सोशल डिस्टन्सचा पार धुव्वा उडाला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *