वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
गडचिरोली : दि.30 ऑगस्ट 2020 :
गडचिरोली जिल्हयात वैनगंगा नदीकाठी पूरस्थिती – वडसा, आरमोरी, गडचिरोली, मार्कंडा,अहेरीसह सिरोंचा भागात सर्तकतेचा इशारा … कालपासून देसाईगंज तालुक्यातील सावंगी, धरमपुरी येथील 60 + 300 असे 360 व आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावातील 24 व्यक्तींना तात्काळ स्थानिक प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले असून मौजा वाघाडा, ता. आरमोरी येथील सुमारे 200 व्यक्तींना आरमोरी तालुका मुख्यालयी हलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सध्या गोसेखुर्द धरणामधून 30598 क्यूमेक्स एवढा विसर्ग सुरू आहे.गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा/प्राणहिता/गोदावरी पात्रात अनुक्रमे पाणी पातळीत वाढ होत राहणार आहे. भविष्यात गोसेखुर्द मधून आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, सबब सर्व संबधीत प्रशासकीय यंत्रणेने तत्पर रहावे अशा सूचना जिल्हाधिकारी गडचिरोली यांनीं दिले आहे.
नदिकिनारी सर्व गावांनी/नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी उचित काळजी घ्यावी असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
