मुंबईत नवीन IIM !
मुंबईत नवीन IIM !
मुंबई दि- १६ जुलै ;
मुंबईला नवीन IIM देण्यास मोदी सरकारने मान्यता देण्यात आली आहे. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग, पवई (नीटी) ला IIM ची मान्यता मिळाली आहे. आता तरुणांना अन्य राज्यात जाण्याची गरज नाही. मुंबईत ३५० जागा एमबीएच्या घेवुन आयआयएम सुरू होणार आहे, अशी माहिती भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिली.
आता आमचे राजकीय विरोधक तोंड बंद का करून आहेत? असा आमचा सवाल आहे. खोट्या आणि विपर्यास असणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करून मुंबईतून, राज्यातून हे गेले बाहेर ते गेलं बाहेर असं खोटं सांगितलं जातं. केवळ राजकीय स्वार्थासाठी काम करणारे उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे असो हे आज मुंबईला आयआयएम आले याच्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. ते आज मूग गिळून गप्प आहेत. मुंबईकरांशी यांचं पुतना मावशीचं प्रेम आहे. अन्य पक्ष राजकारणातले स्कोर सेटल करण्यासाठी काम करतात भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींचे सरकार हे उद्याचे भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत. विकासाचे काम करत आहेत असेही ते म्हणाले.
अगोदरच्या सरकारच्या काळातील एम्सपेक्षा २१४ टक्के वाढ मोदी सरकारमध्ये झाली आहे. मेडिकलच्या पदव्युत्तर जागांमध्ये ९३ टक्के वाढ झाली आहे. हे मोदी सरकारचे यश आहे. या सर्व बाबी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. मेडिकल पदवी संबंधी जागा ७५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सात नवीन आयआयटी आठ नवीन आयआयएम होत आहे. यामुळे जगाच्या पातळीवर भारतीय विद्यार्थी चमकणार आहेत. शहरी बेरोजगारीचा दर ६.८ टक्क्यांनी कमी झाला हे आकडेवारी सांगते, असेही आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले
