वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवा..
वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवा..
मुंबई, दि. १३ जुलै ;
राज्याच्या विकासात वस्त्रोद्योगाची महत्वाची भूमिका आहे. नवीन वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून महाराष्ट्र वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या नवीन संकेतस्थळाचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात, करण्यात आला.यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग,उपसचिव श्रीकृष्ण पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, या https://mahatextile.maharashtra.gov.in (वेबसाईट) संकेतस्थळावर वस्त्रोद्योग विभाग, वस्त्रोद्योग आयुक्तालय,रेशीम संचालनालय
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ,कार्यक्रम अंदाजपत्रक याची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाची जागतिक बाजारपेठेतील माहिती बरोबरच उद्योजकांना स्पर्धात्मक राहण्यास नक्कीच मदत होईल असेही मंत्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
