उद्धवजी, ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर उपचार घ्या !

0
images (11)

उद्धवजी, ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर उपचार घ्या !

मुंबई, दि. ११ जुलै ;
उद्धव ठाकरे व भाजपा यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची लढाई तीव्र होत चालली आहे. उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौ-यात भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे ही टीका भाजपाला चांगलीच झोंबली आहे. उद्धव ठाकरेंचा टीकेचा घाव वर्मी लागल्याने भाजपानेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या गदारोळात महाराष्ट्राच्या राजकारण मात्र कलंकीत झाल्याचे दिसत आहे.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की,  ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक! आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक! सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!  सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक..

ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक! पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक! कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!

स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *