‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करा..

0
IMG-20230705-WA0099

‘त्या’ नराधमावर कठोर कारवाई करा..

मुंबई, दि. ९ जुलै ;

पंडिता रमाबाई मुक्ती मिशन, केडगाव येथील तीन गतिमंद मुलींवर मुक्ती मिशन मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका मजुराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यवत पोलीस स्टेशन येथे त्यानुषंगाने दि. ७ जुलै २०२३ रोजी तीन वेगवेगळे FIR दाखल करण्यात आले आहेत. त्यातील आरोपी सुभाष झोरे, 35 वर्षे, रा. केडगाव ता. दौंड यास अटक करण्यात आली आहे. याबाबतचा तपास उप-विभागीय पोलीस अधिकारी दौंड स्वप्नील जाधव करत आहेत. गुन्ह्येगारास केडगाव, दौंड पोलिसांनी अटक केली असून तो सध्या त्यांच्या ताब्यात आहे. पीडितांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही एक धक्कादायक आणि लज्जास्पद घटना आहे.या मुलींच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे उल्लंघन केले आहे, या मुलींनी अगोदरच त्यांच्या आयुष्यात आधीच अनेक संकटांचा सामना केला आहे. पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ही एक नामांकित संस्था आहे. ही संस्था अनेक वर्षे समाजाची सेवा करत आहे. गरजू महिला आणि मुलींना निवारा, शिक्षण आणि सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करते.

 

अशा घटनेमुळे मिशन आणि त्याच्या कर्मचार्‍यांची प्रतिष्ठा आणि विश्वास कलंकित झाला आहे. पिडीत मुलींचे मनोबल वाढवून त्या बद्दलचे आणखी पुरावे कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून आरोपीस शिक्षे पर्यत पोहचवणे सोपे होऊ शकेल. या घटनेसंदर्भात तपास अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्याशी डॉ गोऱ्हे यांचे तपशीलवार बोलणे झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *