सत्ता येताच मुंबईला लुटणाऱ्यांना तुरुंगात टाकू !
सत्ता येताच मुंबईला लुटणाऱ्यांना तुरुंगात टाकू !
मुंबई, दि. २ जुलै:
मुंबई महापालिकेविरुद्ध एसआयटीचे आदेश दिले आहेत तसेच आदेश ठाणे, नाशिक आणि पुणे महापालिकेच्या कारभाराविरुद्धही द्या. सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच दिसेल. मुंबईकरांसाठी काम करता की या भ्रष्ट सरकारसाठी? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ, त्या दिवशी सर्वप्रथम मुंबईला ज्यांनी लुटले त्यांना तुरुंगात टाकू, असा हल्लाबोल युवानेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेवर शिवसेनेने आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. या मोर्चाला संबोधन करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे मुंबईतील वादळ आहे महाराष्ट्रातील वादळ अजून सुरू केले नाही. खोके सरकारचे भूत पळवून लावायचे आहे. आज तुम्ही बिल्डर कंत्राटदार म्हणून आले तर रेड कार्पेट टाकतील. तुम्ही गेले तर सांगतील खोके खायचा वेळ आहे. चोरी केली जाते चोरी करायला लावतात. जानेवारी पासून मी पत्रकार परिषद घेत आहे. मी वेगळे वेगळे विषय मांडले. मी पत्र लिहिली मला उत्तर आले नाही. शिवसेना असताना जी कामं व्हायची ती होत नाहीत
मुंबईत इतके निच राजकारण पाहिले नव्हते. मुंबई आमची आहे, लुटू नका. फाईलवर सही करताना लक्षात ठेवा. आमचे सरकार आले की पोलिस येणार, तुम्हाला तुमची जागा दाखवणार. रस्त्यांची कामं सुरू व्हायच्या आधीच ६०० कोटी देणार होते. का कारण आपले मित्र आहेत म्हणून पण मी पत्रकार परिषद घेतल्यावर ते थांबले. मुंबईतील रस्त्याचे टेंडर ६०८० कोटीपर्यंत नेले आहे. चाळीस तक्के फायदा कंत्राटदारांना दिला. १८% अजून वाढवून दिले. ५८% ह्यांच्या आणि मुख्यमंत्री आसपास लोकांच्या खिशात गेले. मी बोललो तर माझ्यावर टीका केली जाते.
ज्या दिवशी सरकार येईल आणि ते लवकर येणार त्या दिवशी पहिले काम मुंबईतील लुटारूंना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिकेत २५ वर्ष आपण काम करून दाखवले. हा घोटाळा तीन टप्प्यात आहे.भाजप आमदार घोटाळा काढला आहेत. ह्यांनी मिंधे सरकारला पाठिंबा दिला आहे. शिवसेना मुंबई, महाराष्ट्रासाठी लढणार आहे. मुंबई दिल्लीसमोर झुकली नाही. ह्यांना दिल्लीसमोर कटोरा घेऊन उभे राहिले आहेत. मुंबईत सगळे बघितले सगळे ऐकून घेऊ, मुंबईकरांच्या पैशाला हात लावाल तर याद राखा.
गेल्याच आठवड्यात वांद्र्यात ह्याच मुंबई महापालिकेच्या माजलेल्या अधिकाऱ्याने शाखेवर बुलडोझर चालवला, हातोडा चालवला. कोणाच्या फोटोवर चालवला. कोणी चालवला, कोणाच्या आदेशाने चालवला हे माहित आहे. आजपासून सभा, मोर्चा असेल हेच ध्येय घेऊन चालायचे. ज्या दिवशी सरकार येईल त्यादिवशी त्यांच्यावर बुलडोझर चालवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
