मोदीजी सूर्य आहेत तर माणिपूरमध्ये का उगवत नाहीत ?

0
20230624_123317

मोदीजी सूर्य आहेत तर माणिपूरमध्ये का उगवत नाहीत ?

मुंबई, दि. २२ जून ;
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी करत भाजपा, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केले.

उद्धव ठाकरे यांचे भाषण जसेच्या तसे….

शिवसेनेला आज ५७ वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजही जोश ताकत आपल्यामध्ये अजूनही आहे शिवसैनिकांची अफाट गर्दी जमलेली हॉल भरलेला आहे आणि दुसऱ्या टोकाला गारदी जमलेले आहेत. गर्दी शब्दाचा अर्थ असा की पेशवे काळात लढाई करताना गोंधळ घालण्यासाठी वसूली करण्यासाठी ठेवलेली टोळी. शिवसैनिकांना हसवण्यासाठी हास्य जत्रेचे कलाकार आले त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. दुसऱ्यांना दुःख देण्याचा आनंद काही विकृतांना असतो. मणिपुरी मध्ये जा असे मी बोलो तर मला बोलतात की सूर्यावर थुंकू नका जर मग हे सूर्य आहेत तर माणिपूरमध्ये हे का उगवत नाहीत…?  सीरिया आणि लिबिया सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहेत अशी माहिती आपले लेफ्टनंट जनरल निशिकांत यांनी दिली. सीरियाचा हुकुमशहाची शेवटी काय परिस्थिती झाली सर्वांना माहीत आहे त्यांना शेवटी गटारामध्ये लपून बसायची वेळ आली. तिथे भाजपवाले असले तरीही मारले जाऊ नये हे आमचं हिंदुत्व आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी हास्य जत्रेचा प्रयोग केला तो व्हिडिओ आहे माझ्याकडे. कोविडची लस मोदीजींनी शोधून काढली मग बाकीचे संशोधक गवत उपटत बसले होते का ? मोदींच्या अंधभक्तांना वॅक्सिंग द्यायची सध्या गरज आहे. मानसिक रुग्णांना समीर चौगुले यांच्या दवाखान्यात पाठवले पाहिजे सगळे अवली आहेत. लवली इथे कोणीच नाही. तुम्ही अवली  असले तरी जनता तापली आहे.

काँग्रेस सत्तेत होती तेव्हा इस्लाम खतरे मे है असे बोलायचे आता भाजपवाले सत्तेत आहेत तर हिंदू खतरे मे है असे बोलतात याचा अर्थ काय ..? तुम्ही सत्ता चालवायला नालायक ठरलाय. हिंदू आक्रोश करत आहेत काश्मीर मध्ये अजूनही हिंदू मारले जात आहेत. देशाचे शत्रू संपवा तुम्ही राजकारणामध्ये शत्रू संपवत निघालेले आहात. लेफ्टनंट जनरल निशिकांत सिंग यांनी तिथली परिस्थिती ट्विटरवर ट्विट केलेली आहे हे मी नाही बोलत आहे. शिवसैनिकांना थोडा आनंद देता यावा म्हणून  बाळासाहेबांनी मार्मिक चालू केले.

कोर्टाचा निकाल लागलेला आहे त्यामुळे यांना ट्रॅव्हल्स कंपनी काढायला सोपे जाईल गुजरातला गेल्यावर कुठे रहायचे ?  गुवाहाटीला कुठे रहायचे ?  दिल्लीत गेल्यावर मुजरा कसा करायचा ?  हा सर्व अनुभव गाठीशी आलेला आहे. इतका अनुभव आलेला आहे की, त्याच्या गाठी झालेल्या आहेत गुजरातला गाठीशेव खात आहेत. रक्त सांडून घाम गाळून शिवसैनिकांनी तुम्हाला उभ केल होता आयत्या बिळावर तुम्ही नागोबा झालेला आहात. भाजपवाले तुम्हाला दूध पाजतील, पुंगी वाजवतील, टोपलीत घालतील आणि देतील सोडून.

हे आल्यापासून पाऊस सुद्धा लांबला आहे परंतु पाऊस पडू दे बळीराजाला त्याच फळ मिळू दे. हे सत्तेत आल्यापासून जाहिरातींवर जेवढा खर्च झालेला आहे तेवढा खर्च शेतकऱ्यांना दिला असता तरी आपल्या बळीराजाचं संकट दूर झाल असत. मी कधी हिम्मत हरलो नाहीच आणि हरणार पण नाही. मला नेहमी असं वाटतं की शिवसेना प्रमुख आपल्याकडे बघत आहेत आपली परीक्षा घेत आहेत. अतिरेक्यांचा संकट असो की धमक्या असो हे सर्व मी सोसल आणि ही सर्व फौज उभी केली. जिकडे आव्हान आहे तिथे शिवसेना , जिथे शिवसेना आहे तिथे आव्हान हे असंलच पाहिजे.

नोकिया मोबाइल मधल्या स्नेकच्या खेळाप्रमाणे आपल्याला आव्हान पेलत जायचं आहे परंतु हे आव्हान आपल्याला संपवायचे आहे आणि हे शेवटचं असणार आहे आपल्याला हा शत्रू संपवायचा आहे. राम मंदिर बांधलेले असताना देखील आजही त्यांना उद्धव ठाकरे यांचा जप करावा लागत आहे. उद्धव ठाकरे हा एकटा नाही हा समोर बसलेला सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे आहे. तुम्ही बाळासाहेबांचा फोटो चोरू शकता परंतु मनातले बाळासाहेब तुम्ही चोरू शकणार नाही. आजही काहीजण जात आहेत आणि कोणी जात असेल तर जाऊ द्या शिवसेनेला काही धक्का वगैरे बसत नाही.

अस्वलाचा एक केस उपटला म्हणून असं टकलं होत नाही. अजूनही जर कोणी भाडोत्री असतील तर ते पण तुम्ही घेऊन जा. माझ्याकडे यादी पाठवा आणि घेवून का मी पाठवतो. नितीन यांनी उदाहरण दिले की, आमचं पीक जरी तुम्ही नेलं कापून तरी शेती आमची आमच्याकडेच आहे. शेतातले तण आम्ही काढून टाकतो. तुम्ही जी मेहनत घेतली आहे ती आम्ही वाया जाऊ देणार नाही आपण भक्कम आहोत त्यांच्या छाताडावरती आपण उभे राहू.

जय हिंद, जय महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *