चित्रनगरीच्या सुविधांसाठी शंभर कोटींचा निधी. 

0
images (96)

चित्रनगरीच्या सुविधांसाठी शंभर कोटींचा निधी.

मुंबई, दि. १ जून :
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसराच्या पायाभूत सोयी-सुविधा आणि विकास कामांसाठी शासनाकडून रू.100 कोटीचा निधी प्राप्त झाल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

जगप्रसिद्ध असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरीत नियमित वाणिज्यिक तत्वावर चित्रीकरण सुरु असते. काळानुरूप चित्रीकरणाच्या बदलत्या गरजेनुसार चित्रीनगरीही बदलत  असून चित्रीकरण करणाऱ्या संस्थाना दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे प्रयत्नशील आहेत. शासनाकडून मिळाल्या निधीतून चित्रनगरीतील कलागारांचे ( स्टुडीओ) बाहेरील दुरुस्तींची कामे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चित्रनगरीतील हद्दीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संरक्षक भिंती बांधल्या जाणार आहेत. तसेच यापूर्वीच्या संरक्षक भिंतींची डागडुजी करण्यात येणार आहे. चित्रनगरीच्या परिसरात नियमित २० हजाराहून अधिक लोकं आणि ७ हजाराहून अधिक वाहन विविध कामांसाठी ये-जा करत असतात. त्यामुळे अंतर्गत रस्ते विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

ही चित्रनगरी सर्वासाठीच आकर्षणाचा भाग असल्याने चित्रीकरणाच्या दृष्टीने तसेच पर्यटनाच्या दृष्टीने छोट-छोटी चित्रीकरण स्थळे नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत. तर सध्या अस्तित्वात असणारी बाह्यचित्रीकरण स्थळांचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आगामी काळात चित्रीकरण करण्यासाठी निर्मितीसंस्थाना  आवश्यक त्या सर्व सुविधा चित्रनगरी परिसरातच उपलब्ध होतील यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही सुरु असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *