शक्तीप्रदर्शनात निष्पाप १३ नागरिकांचा मृत्यू ही बाब अत्यंत दुर्देवी

0
IMG-20230416-WA0006

शक्तीप्रदर्शनात निष्पाप १३ नागरिकांचा मृत्यू ही बाब अत्यंत दुर्देवी.

मुंबई, दि. १७ एप्रिल ;

तुम्ही आपल्या अमदारांसाठी भाजपकडून ५० खोके घेऊ शकता पण मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला फक्त ५ लाख मदत दिली जाते. हा भारतासह महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे आणि आम्ही तो कदापी सहन करणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली.

महाराष्ट्राचे ५० खोके सरकार काहीच करू शकत नाही हे सर्व जनतेला माहीत आहे. सत्तेची खुर्ची उपभोगावी याकरिता शक्तिप्रदर्शनसाठी महाराष्ट्रातील जनतेची आहुती दिली, तरी त्यांनां चालणार आहे, अशी टीका प्रीती शर्मा मेनन यांनी केली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र भूषणपुरस्कार या कार्यक्रमाचे इतक्या उन्हाळात आयोजन करण्यात आले. देशाच्या गृहमंत्र्यांना शक्ती प्रदर्शन दाखवायचे होते म्हणून ४२ डिग्री उन्हात हजारो लोकांना बसवण्यात आले. उन्हाळ्यात मोकळ्या जागेत राज्यात मोठे मोठे कार्यक्रम घेण्यास पाबंदी असतानाही महाराष्ट्र भूषण कार्यक्रम हा भर उन्हात घेण्यात आला राज्य सरकार यातही राजकारण करू पाहते आहे का? असा सवाल प्रीती शर्मा मेनन यांनी उपस्थीत केला.

सरकारी कार्यक्रम होता तर तो वातानुकूलित सभागृहात घेता आला असता परंतु खोके सरकारला शक्ती प्रदर्शन करून आपण काय करू शकतो हे दाखवून द्यायचे होते. पण या शक्तीप्रदर्शनात निष्पाप १३ नागरिकांचा मृत्यू झाला, ही बाब अत्यंत दुर्देवी आहे, अशी खंत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *